भाजपा उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रुपये ७ लाख १ हजारची मदत * मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

AVB NEWS गडचिरोली: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या सामाजिक आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रुपये ७ लाख १ हजार रुपयांची थेट मदत दिली आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या वतीने हा धनादेश मुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वाढदिवसाचा सार्वजनिक उत्सव टाळून, जाहिराती, फलक, पुष्पगुच्छ किंवा हार यांवर अनावश्यक खर्च न करता, समाजोपयोगी कार्यासाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’स योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या विधायक आवाहनाला प्रतिसाद देत, भाजपा उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल यांनी थेट ७ लाख १ हजारची रुपयांची मदत देत समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.
यावेळी सह पालकमंत्री अँड आशिष जयस्वाल, आमदार डॉ. परिणय फुके, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार मिलिंद नरोटे, माजी आमदार कृष्णा गजबे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेश जेठाणी, भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल आणि माजी नगरसेवक नरेश विठ्ठलानी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण समोर आले आहे.