जीडीसीसी बॅंकेचा उत्कृष्ट राज्यस्तरीय बॅंक पुरस्काराने गौरव * केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हस्ते सिईओ आयलवार यांनी स्विकारला पुरस्कार

एव्हीबी न्यूज गडचिरोली .:- गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नाबार्ड कडून राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा बँकेचा पुरस्कार मिळाल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बैंक (नाबार्ड) ने ४४ व्या स्थापना दिनानिमीत्त राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा मध्यवती सहकारी बैंका व राज्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे विविध पुरस्काराने नुकतेच सन्मानीत करण्यात आले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन २०२३-२४ या आर्थीक वर्षामध्ये ठेवी, कर्ज, व्यवसायिक उलाढाल, वसुली, नफा, नेटवर्थ, कर्जे, एन.पी.ए. चे प्रमाण या रिझर्व बैंक व नाबार्ड यांनी ठरवून दिलेल्या सर्व निषावर बैंकले उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार केंद्रीय सहकार तथा नागरी विमान उड्डायन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुरस्कार बैंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी स्विकारला.
सदर पुरस्कार वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी (यशदा ) पुणे येथे आयोजीत करण्यात आला होता. पुरस्कार कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे सहकार विभागाचे अतिरीक्त सचिव प्रविण दराडे, नाबार्डचे उपकार्यकारी संचालक गोवर्धन रावत,सहकार आयुक्त दिपक तावरे, नाबार्डच्या मुख्य महाप्रबंधक रश्मी दराड आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वांच्या सहकार्यामुळे पुरस्कार
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक जिल्ह्यात ५७ शाखांच्या माध्यमातून व २५४ सेवा,आविका सहकारी संस्थांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना पिक कर्जवाटप करीत आहे. त्याचप्रमाणे बँकेने ग्राहकांना विविध अत्याधुनीक डिजीटल सुविधउपलब्ध करुन दिलेल्या आहेत. नावार्डकडून बँकेला राज्यस्तरावरचा उत्कृष्ट जिल्हा बँक पुरस्काराने सन्मानीत केल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष प्रचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, बँकेचे संचालक मंडळ व सर्व अधिकारी,कर्मचारी यांनी जिल्ह्यातील बँकेचे खातेदार, ग्राहक, जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी,सभासद यांच्या सहकार्यामुळेच बँकेला पुरस्कार प्राप्त झाला, त्याबद्दल त्यांचे आभार मानले.