मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचा वाढदिवस सेवाभाव दिन म्हणून साजरा होणार * माजी खा. डॉ. अशोक नेते यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचा वाढदिवस २२ जुलै २०२५ (मंगळवार) सेवाभाव दिन म्हणून साजरा होणार या औचित्याने माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या वतीने गडचिरोली येथे सेवाभावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन माजी खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले असून या कार्यक्रमाचा सर्व दिव्यांग व गरजू बांधवांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन सेवाभावाचा लाभ घेण्याचे आवाहन भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.
दिव्यांग व अंध बांधवांसाठी विशेष मदतीचा हात!
कार्यक्रमामध्ये अंध व्यक्तींना स्पेशल सेन्सिटिव्ह स्टिक्स (Voice Sensor Stick) चे वाटप करण्यात येणार आहे. या स्टिकच्या साहाय्याने त्यांना आवाजावरून माहिती मिळवता येते, दिशा समजते, आणि त्यांची चालण्याची प्रक्रिया अधिक स्वावलंबी होते. ही स्टिक दिव्यांग बांधवांसाठी एक प्रकारची दृष्टी देणारी साथ ठरत आहे.
मतीमंद विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप
गडचिरोली येथील बोदली मतीमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. या साहित्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रवासात प्रोत्साहन मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल.
_ अपंग मुलींना कपडे वाटप_
सामाजिक जाणीवेतून प्रेरित होत, अपंग मुलींना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात येणार आहे, जे त्यांच्यासाठी आदर, आनंद आणि आत्मसन्मान निर्माण करणारे ठरेल.
“माणुसकीचा घास” उपक्रम
सामाजिक जागरूकता निर्माण करत माणुसकीचा घास या उपक्रमाअंतर्गत महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथील रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे.
– आयोजक
मा. खा. डॉ. अशोकजी नेते (राष्ट्रीय महामंत्री, भाजप अनुसूचित जनजाती मोर्चा) . संपर्क साधण्यासाठी क्रमांक कार्यालय:-मो.नं. 1)9421823087 2)8308741707 3)9673757718
