ताज्या घडामोडी

गडचिरोलीत काँग्रेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचा वाढदिवस ‘लॉलीपॉप’ वाटप करून ‘सेलिब्रेट’ करणार * विकासाच्या नावाने केवळ थापा मारल्याचा आरोप

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असून  राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुद्धा जिल्ह्यात कधी कधी  झालेल्या त्यांच्या दौऱ्यात त्यांनी कधीही जिल्ह्यातील युवक, महिला शेतकरी सर्वसामान्य नागरिक यांच्याशी संवाद साधला नाही, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या नाही, मात्र त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना फक्त मोठी मोठी आश्वासन देण्याचे काम  केल्याचा आरोप कॉंग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केला आहे.
त्यामुळे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध समस्यांनी ग्रासलेल्या नागरिकांना चॉकलेट व लॉलीपॉप चे वाटप करण्यात येणार येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिली आहे. सदर कार्यक्रम जिल्हा कॉंग्रेस कमेटीच्या कार्यलयात मंगळवार 22 जुलै रोजी दुपारी 1 वाजता आयोजीत करण्यात आला आहे.

खालील समस्या ग्रस्त नागरिकांना होणार चॉकलेट व लॉलीपॉप चे वाटप

1) रानटी हत्तीच्या हल्ल्यातील जखमीं व रानटी हत्ती आणि पूर परिस्थिती मुळे नुकसान ग्रस्त शेतकरी.
2) डिमांड भरूनही विद्युत मीटर न मिळालेले शेतकरी बांधव.
3) कर्जमाफी व बोनस ची वाट बघणारे शेतकरी
4) घरकुल योजनेतील थकीत हप्ते असलेले घरकुलधारक
5) जिल्ह्यातील शेकडो पदवीधर बेरोजगार तरुण
6) रोजगार देण्याच्या नावाने आदिवासी युवकांना 40 ट्रक च्या चाव्या दिल्या मात्र अद्याप ट्रक न मिळालेले व फसवणूक झालेले आदिवासी युवक.
7) उद्योगपती मित्रांना मदत करण्याकरिता  बडजबरीने किंवा अल्पदरात जमीन अधिग्रहित करून भूमिहीन झालेले शेतकरी.8) वृक्षातोडी विरोधात आवाज उचलत असताना शासनाच्या दडपशाही चा सामाना करावा लागत आहे असे नागरिक.
9) जिल्ह्यातील रस्त्यांच्या झालेल्या दैनिक अवस्थेमुळे त्रस्त असलेले नागरिक.
10) गडचिरोली जिल्ह्यातील रिक्त पदामुळे काम होत नाही असे त्रस्त नागरिक.
11) सुरजागड प्रकल्पात चालणाऱ्या जिल्ह्यातील जड वाहतुकीमुळे अपघातातील जखमी व्यक्ती
12) जिल्ह्यातील शुद्ध पाणी मिळत नसलेले नागरिक.
13) जिल्हा परिषद ची शाळा बंद झाल्यामुळे शिक्षणापासून वंचित झालेले विद्यार्थी.
14) एसटी बसेस ची व्यवस्था नसल्याने त्रस्त झालेले नागरिक,विद्यार्थी.
15) पालकमंत्री जिल्ह्यात नियमित येत नसल्याने खुश असलेले प्रशासनातील अधिकारी.
16) महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेल्या मेडिकल कॉलेजची अजूनही पदभरती न होऊ शकलेल्या व नोकरीच्या प्रतीक्षेतील युवक.
17) सुरजागड प्रकल्पाकरीता जिल्ह्यात आलेलेल्या परप्रांतीयाच्या अन्यायाला बळी पडणारे जिल्ह्यातील नागरिक.
18) महागाईच्या विळख्यात अडकलेले शेतकरी, कष्टकरी महिला, माता भगिनी.यासाह विविध समस्यांनी ग्रस्त शेतकरी महिला युवकांना लालीपॉप व चॉकलेट वाटप करण्यात येणार आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.