ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री 22 जुलै रोजी करणार एलएमईएलच्या स्टील प्रकल्पाची पायाभरणी * मुख्यमंत्र्यांचा वाढदिवसही होणार गडचिरोलीत *माजी.खा.डॉ. अशोक नेते यांनी केली कार्यक्रम स्थळाची पाहणी

AVB NEWS गडचिरोली :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 22 जुलै मंगळवारी जिल्ह्यातील कोन्सरी येथे लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) च्या ४.५ मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेच्या स्टील प्रकल्पाचा पायाभरणी करणार आहेत. हा प्रकल्प विदर्भातील पहिला एकात्मिक स्टील प्रकल्प ठरणार आहे.विशेष म्हणजे 22 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस असून त्याच दिवशी ते या प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस २२ जुलै रोजी कोन्सरी येथे स्टील प्रकल्पाची पायाभरणी करतील. त्याच दिवशी हेडरी येथे उभारण्यात आलेल्या ५ मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेच्या आयर्न ओअर ग्राइंडिंग प्लांटचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. हा प्रकल्प एलएमईएलने केवळ एका वर्षात पूर्ण करून कार्यान्वित केला आहे.

हा भव्य कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री. देवेंद्र  फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असून, जिल्ह्याच्या औद्योगिक वाटचालीतील हा एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.

या पार्श्वभूमीवर माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी कोनसरी येथील कार्यक्रम स्थळाला भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची बारकाईने पाहणी केली. नियोजन, सुरक्षा, वाहतूक आणि स्वागत यंत्रणा यांचा आढावा घेत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले.

या दौऱ्यात भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश  बारसागडे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, प्रकल्प व्यवस्थापक व्यंकटेश, तसेच भोलू सोमनानी उपस्थित होते.

कोनसरी प्रकल्पामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून या प्रकल्पामुळे परिसराचा सामाजिक आणि आर्थिक विकास अधिक गतिमान होईल.असेही माजी खा. अशोक नेते यांनी स्पष्ट केले आहे.

या सोबतच १० मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेच्या स्लरी पाइपलाइन प्रकल्पाचे उद्घाटनही होणार आहे. ही पाइपलाइन महाराष्ट्रातील पहिली कार्यरत लोखंड स्लरी पाइपलाइन ठरणार आहे. हेडरी ते कोन्सारी अशी ८५ किमी लांबीची पॅलेट प्लांट दरम्यान असलेली ही पाइपलाइन कच्च्या मालाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाची असून, ती कार्बन उत्सर्जनात ५५ टक्के घट करेल आणि संपूर्ण प्रकल्पाच्या दळवणळणाची कार्यक्षमता वाढवेल.

कच्च्या मालाच्या वाहतुकीसाठी टाकणार पाईपलाईन
कच्च्या मालाच्या वाहतुकीमुळे सध्या कार्बन उत्सर्जनात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यासाठी लॉयडस मेटल्स तर्फे हेडरी ते कोन्सरी अशी 85 किमी ची पाइपलाइन कच्च्या मालाच्या वाहतुकीसाठी टाकण्यात येणार असून त्यामुळे कार्बन उत्सर्जनात ५५ टक्के घट होईल, अशी माहिती लॉयड्सचे व्यावस्थापकीय संचालक बी. प्रभाकरण यांनी दिली.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.