शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन काँग्रेसने केले कृषी अधीक्षक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन

गडचिरोली :- जिल्हा हा मुख्यतः कृषिप्रधान भाग आहे. जिल्ह्यातील मोठ्या संख्येने नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. सध्या खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असताना शेतकऱ्यांनी धान, कपाशीसारख्या पिकांची पेरणी केली होती. मात्र गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे आणि उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले आहे. अशा परिस्थितीत शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या मदतीस धावून यावे, पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी आणि दुबार पेरणीसाठी आवश्यक ते सर्व शासकीय पाठबळ द्यावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुपार पेरणी करीता उत्तम दर्जाचे बी बियाणे देण्यात यावे, जिल्ह्यात बोगस बी-बियाणे विक्री करणारे व्यापारी व कंपन्या यांचेवर कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुरेश्या प्रमाणात खत मिळत नाही अनेक कृषी केंद्रांवर युरिया व डीएपी खतांचा तुटवडा आहे. तसेच काही ठिकाणी खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना ‘लिंकिंग’ पद्धतीने खते देण्यास भाग पाडले जात आहे, त्यामुळे खत घेणाऱ्या शेतकऱ्यांना खतासोबत दुसऱ्या वस्तूंची खरेदी बंधनकारक केली जाते. ही पद्धत शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर अन्याय करणारी आहे, ती त्वरित थांबवावी व शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खत उपलब्ध करून देण्यात यावे यासह इतर मागण्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात कृषी अधीक्षक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले व जिल्हा कृषी अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, महिला अध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश राठोड, प्रभाकर वासेकर, माजी नगरसेवक रमेश चौधरी, माजी जि. प. सदस्य विनोद लेनगुरे,घनश्याम वाढई, प्रतीक बारसिंगे, पुष्पलताताई कुमरे, आशाताई मेश्राम, अपर्णाताई खेवले, सुनिताताई रायपुरे, शालिनीताई पेंदाम, कविताताई उराडे, मालताताई पुडो, पौर्णिमाताई भडके, उत्तम ठाकरे, सुभाष कोठारे, सुरेश भांडेकर, योगेंद्र झंजाळ, उमेश आखाडे,जितेंद्र मुनघाटे, मिलिंद बारसागडे, जावेद खान, माजिद सय्यद, निखिल खोब्रागडे, श्रीनिवास ताटपल्लीवार, स्वप्निल बेहरे, सुधीर बांबोळे, गोपाल कविराज, चोकाजी बांबोळे, नृपेश नांदणकर, रमेश धकाते, प्रफुल अंबोरकर, जितेंद्र मुप्पीडवार, तोमदेव जुवारे, सुभाष कोठारे, नीलकंठ गेडाम, गोपाल कोमलवार, जोगुजी तुंकलवार, नामदेव वासेकर, लहुजी भांडेकर, नामदेव फावणवाडे, रवींद्र मडावी, रोहिदास अलाम, तुळशीराम बोबाटे, जोगुजी भोयर, रमेश मुनरतीवार, देवराव मोहुर्ले, राजेंद्र कुकडकार, सुभाष धाईत, नामदेव अंडगलवार, जनार्धन तुंकलवार सह शेकडोच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.