संपादकीय

सिडीसीसी बॅंकेच्या निवडणूकीतच एसआयटी चौकशीचा ससेमिरा * बॅंकेतील नोकर भरतीचे प्रकरण, माजी संचालकांचे धाबे दणाणले

एव्हीबी न्यूज गडचिरोली  ;- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. अध्यक्षपदाच्या निवडीच्या हालचालींना वेग आला असतांनाच बॅंकेतील नोकरभरती घोटाळयांच्या चौकशी संदर्भात एसआयटीने नेमके हेच टायमिंग साधीत चौकशीला प्रारंभ केल्याने माजी संचालकांचे धाबे दणाणले आहेत. चौकशी अधिकाऱ्यांनी नोटीसा पाठविण्याची प्रक्रिया गतीमान केली असून नोकरभरतीच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

च्ंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 21 संचालकांची निवडणूक मागील आठवडयात पार पडली. अध्यक्षपदावर कॉंग्रेस व भाजपाने दावा केला असतांना आता बॅंकेच्या नोकरभरती घोटाळयाच्या चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे. विशेश म्हणजे नोकरभरती चौकशीचा ससेमिरा सुरू होताच  बॅंकेच्या एका माजी अध्यक्षाने भाजप मध्ये प्रवेश घेतल्याची चर्चा चांगलीच रंगत आहे. जिल्हा बॅकेच्या निवडणूकीनंतर भाजपाने अध्यक्षपदासाठी ताकद पणाला लावली आहे. त्यासाठी बॅंकेचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे यांचा भाजपा प्रवेश घडवून आणल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
नोकरभरती प्रकरणात राज्य शासनाने पोलीस अधीक्षक सुंदर्शन यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपविली आहे. त्यांनी चौकशीचा वेग वाढविला आहे. बॅकेच्या नोकरभरतीचे प्रकरण कोणते वळण घेते याकडे लक्ष लागले असून हे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहे.

आ. मुनगटींवारांनी केली सीआयडी चौकशीची मागणी
आ. सुधिर मुनगंटीवार यांच्या मागणीवरून बॅंकेच्या नोकरभरती प्रकरणाची चौकशीसाठी एसआयटीची स्थापना झाली. मात्र पोलीस अधीक्षकांकडे चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आल्याने आ. मुनगंटीवार यांनी चौकशीच्या निश्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेऊन सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.

 

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.