कुणाल पेंदोरकर यांची असंघटीत कामगार कर्मचारी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती * काँग्रेसचे विधीमंडळ गट नेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
कुणाल पेंदोरकर यांचे कामगार क्षेत्रातील योगदान प्रशंसनीय ;- आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन

AVB NEWS गडचिरोली :- येथील काँग्रेसचे सक्रीय युवा कार्यकर्ते कुणाल पेंदोरकर यांची महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कर्मचारी कॉंग्रेसच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कर्मचारी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल शिंदे यांनी पेंदोरकर यांची नियुक्ती केली असून कॉंग्रेसचे विधीमंडळ नेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते खा.नामदेव किरसान यांच्या उपस्थितीत कुणाल पेंदोरकर यांना नियुक्तपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी आ. विजय वडेट्टीवार यांनी पेंदोरकर यांना शुभेच्छा देत असंघटीत कामगार, कर्मचार्यांना न्याय मिळवून देउुन त्यांच्या कल्याणासाठी झटावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कुणाल पेंदोरकर हे गेल्या अनेक वर्शापासून गडचिरोली जिल्हा युवक कॉंग्रेसमध्ये कार्यरत असून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. नागरिकांच्या कोणतीही समस्या असल्यास त्या प्रशासनासमोर मांडून समस्यांचा निपटारा करणे, अन्याया विरोधात वाचा फोडून गोरगरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्वपुर्ण योगदान दिले आहे.
अनेक कामगार कर्मचारी यांना कुणाल पेंदोरकर यांनी न्याय मिळवून दिला आहे’ सामान्य रुग्णालयातील असो जिल्हा परिषद असो नगर परिषद अशा अनेक कामगारांना व कर्मचाऱ्यांना पेंदोरकर यांनी न्याय मिळवून दिला आहे. पेंदोरकर यांनी कामगार क्षेत्रामध्ये दिलेले भरीव योगदान लक्षात घेऊन व त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन प्रदेश असंघटीत कामगार कर्मचारी कॉंग्रेसच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती असंघटीत कामगार कर्मचारी कॉंग्रेसचे राश्टीय अध्यक्ष डॉ. उदीत राज, कॉंग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष हर्शवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने असंघटीत कामगार कर्मचारी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल शिंदे यांनी केली आहे. कुणाल पेंदोरकर यांनी आपल्या पदाचा उपयोग कामगारांच्या कल्याणासाठी करून कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन कामगारांना कॉंग्रेसच्या विचारधारेशी जोडण्यासाठी प्रयत्न करावी, अशी अपेक्षाही श्री. शिंदे यांनी व्यक्त केली आहे. असंघटीत कामगार कर्मचार्यांच्या कल्याणासाठी आपल्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असून कोणत्याही कामगारांवर अन्याय होवू देणार नाही. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव कटीबध्द असल्याची ग्वाही कुणाल पेंदोरकर यांनी दिली आहे.
पेंदोरकर यांनी आपल्या निवडीचे श्रेय विधानसभा गटनेते माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार, खासदार नामदेव किरसाण, आमदार रामदास मसराम, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, छोटू भाऊ शेख, युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ मेश्राम यांना दिले
आ. विजय वडेट्टीवार यांनी कुणाल पेंदोरकर यांना नियुक्तीप्रत्र प्रदान करतांना खा.नामदेव किरसान, मनोहर पाटील पोरेटी माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली ऍड कविता मोहरकर महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्षय छोटू भाऊ शेख युवा नेते राकेश नागरे रजनीकांत मोटघरे अनुसूचित जाती सेल जिल्हा अध्यक्ष घनशाम वाढई विधानसभा उपाध्यक्ष कमलेश खोब्रागडेए तौफिक शेखए जावेद शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते