ताज्या घडामोडी
गडचिरोली जिल्हयाच्या उत्तर भागाला मुसळधार पावसाचा तडाखा ; पुरामुळे तब्बल 16 मार्ग बंद, जनजीवन विस्कळीत
एव्हीबी न्यूज गडचिरोली :- गडचिरोली जिल्हयात मान्सूनने हजेरी लावली असून मागील चोवीस तासात जिल्हयातील कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी व कोरची तालुक्याला मुसळधार पाऊस कोसळला. तसेच भंडारा जिल्हयातील गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात आल्याने उत्तर भागात पुरपरिस्थती निर्माण झाली असून नदी, नाल्यावरून पाणी वाहत असल्याने आज मंगळवारी पुरामुळे तब्बल 16 मार्ग बंद पडले आहेत. विशेश म्हणजे मागील चोवीस तासात देसाईगंज तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद झाली असून या तालुक्यात 168.0 मी.मी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल कोरची तालुक्यात 145.0 मी.मी, कुरखेडा तालुक्यात 103.7 मी.मी पावसाची नोंद झाली.