उद्या काँग्रेसचे ‘थाली बजाओ – ताली बजाओ आंदोलन ! * आंदोलनातून जिल्हयातील मलेरियाच्या वाढत्या प्रकोपाकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधणार

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- जिल्हयात मलेरियाचा प्रादुर्भाव वाढला असून रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे रूग्णांना जीव गमवावा लागला आहे. वाढत्या मलेरियावर तातडीने उपायोजना करण्यात यावी या मागणीच्या अनुशंगाने ‘‘गो मलेरिया गो.- पालकमंत्री दो’ आणि गडचिरोली जिल्हयातील आरोग्याचा प्रशासनाने केला खो हा नारा देत उद्या 8 जुलै रोजी कॉंग्रेसच्या वतीने ‘थाली बजाओ ताली बजाओ’ आंदोलन करण्यात येणार आहे.
सदर आंदोलन दुपारी 3 वाजता जिल्हा परिशदेसमोर करण्यात येणार आहे. जिल्हयातील आरोग्य व्यवस्था पुरती कोलमडलेली असून मलेरियाची रूग्ण संख्या वाढत आहे. आतापर्यंत जिल्हयात अडीच हजाराहून अधिक मलेरिया रूग्ण आढळून आले असून मागील चार दिवसात १० नागरिकांचा अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे जीव गमवावा लागला आहे. शासन यावर उपायोजना करण्यास अकार्यक्षम असल्याचा आरोप कॉंग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केला आहे.