जिल्हा

लॉयड्स मेटल्स, एलटी गोंडवाना तर्फे कर्मचारी, कुटुंबियांसाठी ‘गौरव तुमचा, अभिमान आमचा’ कार्यक्रम   * कार्यक्रमाच्या माध्यमातून कंपनी व कर्मचाऱ्यांमधील सबंध मजबूत करण्याचा प्रयत्न

AVB NEWS गडचिरोली: लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड आणि एलटी गोंडवाना स्किल हब प्रायव्हेट लिमिटेड ह्यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी येथील वासवी सेलिब्रेशन हॉलमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ‘गौरव तुमचा, अभिमान आमचा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  उपस्थितांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक . बी. प्रभाकरन म्हणाले की, या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कर्मचारी आणि कंपनीमधील संबंध मजबूत करणे, संवाद आणि विश्वास वाढवणे, आणि दैनंदिन जीवनात शिस्त कशी राखायची याबद्दल मार्गदर्शन करणे हा होता. गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक समुदायांना सक्षम बनवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे कल्याण ह्याबाबतच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करणाऱ्या श्री. प्रभाकरन यांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

कार्यशाळेदरम्यान, प्रसिद्ध कॉर्पोरेट प्रशिक्षक. गोपी गिलबिले आणि त्यांच्या पत्नी यांनी विविध सादरीकरणे, संवादात्मक सत्रे, आणि प्रेरक उदाहरणे ह्यांच्या माध्यमांतून कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना प्रेरित केले. उपस्थितांनी संवादात्मक सत्रांमध्ये उत्साहाने सक्रिय सहभाग घेतला. कर्मचाऱ्यांनी भविष्यात असे उपक्रम नियमितपणे आयोजित करण्याची विनंती केली.
एल टी गोंडवाना चे संचालक डॉ. चरणजित सिंग सलुजा, साई कुमार,. रोमित तोंबर्लावार,  बलराम सोमनानी,  संजय चांगलानी, . हर्षवर्धन बाबा आत्राम, तनुश्रीताई आत्राम, आणि एलएमईएल चे उपाध्यक्ष (मानव संसाधन) सिद्धार्थ दास कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विनोद कावेरी यांनी केले.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.