संपादकीय

मानव- हत्ती संघर्षावर विशेष उपायोजना करण्याची गरज..!  * सहकार नेते अरविंद पोरेडीवार यांनी वेधले वन प्रशासनाचे लक्ष  * हत्ती संकटावर ऑनलाईन बैठकीत मंथन

एव्हीबी न्यूज गडचिरोली  :- गडचिरोली जिल्हयात वाघ्र हल्ल्यापाठोपाठ हत्तीचे संकट गडद झाले आहे. यामुळे शेतीकामांवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र फॉर टान्सफार्मेशन ( मित्र ) या संस्थेची ऑनलाईन बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत गडचिरोली जिल्हयातील हत्ती संकटावर मंथन करण्यात आले. सहकार नेते तथा वन्यजीव अभ्यासक अरविंद पोरेड्डीवार हे या बैठकीला विशेश निमंत्रीत होते. त्यांनी या बैठकीत सहभाग घेऊन मानव वनज्यीव संघर्ष रोखण्यासाठी विशेश उपायोजना सुचविल्या. त्याचबरोबर मानव हत्ती संघर्षावर तोडगा म्हणून छत्तीसगड राज्याच्या धर्तीवर ‘गजरथ यात्रा’ उपक्रम राबवविता येईल असा पर्यायही सुचविला.

बैठकीला अप्पर मुख्य वनसचिव, प्रधान मुख्य वनसंरक्षक, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांसह गडचिरोली, नागपूर व चंद्रपूर जिल्हयाचे मुख्य वनसंरक्षकही उपस्थित होते. ओरीसा राज्यातून छत्तीसगडमार्गे रानटी हत्ती गडचिरोली जिल्हयाच्या जंगलात दाखल झाले आहेत. मागील तीन वर्शापासून हत्तींनी धुमाकुळ घातला असून त्यात दोन टस्कर हत्तीची भर पडली आहे. या हत्तींनी जिल्हयातील नागरि वस्त्यांमध्ये मुक्त संचार केला आहे. रानटी हत्तीनी पिकांचे मोठे नुकसान केले आहे. तसेच आतापर्यंत या हत्तींनी 10 जणांचा बळी घेतला आहे.

अरविंद पोरेड्डीवारांनी वनविभागाचे वेधले लक्ष
सहकार नेते तथा वन्यजीव अभ्यासक अरविंद पोरेड्डीवार हे या ऑनलाईन बैठकीला विशेश निमंत्रीत होते. त्यांनी या बैठकीत सहभाग घेऊन मानव वनज्यीवसंघर्ष रोखण्यासाठी विशेश उपायोजना सुचविल्या. त्याचबरोबर मानव हत्ती संघर्शावा तोडगाव म्हणून छत्तीसगड राज्याच्या धर्तीवर ‘गजरथ यात्रा’ उपक्रम राबवविता येईल असा पर्यायही सुचविला. मानव वन्यजीव संघर्श रोखण्यासाठी वनउपजावर आधारीत निर्भरता कमी करणे, जंगलालगतच्या शेतीला संरक्षक उपायोजना करणे, वनरीक्षेत्रात रूग्णवाहीक सज्ज ठेवणे, सर्व शासकीय विभागांनी संयुक्तपणे स्थानिक निकडीनुसार उपाय करणे आदी पर्याय अरविंद पोरेड्डीवारांनी सुचविले.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.