सामाजिक

दु:ख सागरात बुडालेल्या शिवसैनिकाच्या कुटुंबाला कात्रटवारांनी दिले जगण्याचे बळ !  * मृतक शिवसैनिक रामदास ठाकरे यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी बरोबरच शेतीच्या मशागतीचा खर्च उचलला…  * शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा “वर्धापन दिन” अरविंद कात्रटवार यांच्या वतीने “सेवाभाव दिन” म्हणून साजरा…

AVB NEWS गडचिरोली :- 
राबराब राबून आपल्या कुटुंबाचा गाडा चालविणारा कुटुंबातील कर्ता पुरूष अचानक आपल्या कुटुंबाला सोडून गेल्यानंतर कुटुंबावर किती आघात कोसळतो यांची कल्पनाच न केलेली बरी. अशाच एका गरीब शिवसैनिकाचे हदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. शिवसैनिकाच्या निधनामुळे कुुंटुबियावर मोठे संकट कोसळले. या दु:ख सागारात बुडालेल्या ठाकरे कुटुंबाच्या मदतीसाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार धावून गेले. कात्रटवार यांनी कुटुंबाला आधार देत जीवनावश्यक साहित्य, लागवडी पासून ते पिक निघेपर्यंत शेतीच्या संपुर्ण मशागतीचा खर्च आणि शिक्षण घेत असलेल्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारून त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करून जगण्याचे बळ दिले.

जनतेच्या कल्याणासाठी सदैव झटणारे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लढवय्ये शिवसैनिक अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वतीने शिवसेनेचा वर्धापन दिन ‘सेवाभाव दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील चांभार्डा येथील शिवसैनिक रामदास ठाकरे या गरीब शिवसैनिकाचे हृदयविकाराच्या झटक्याने नुकतेच दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी वनिता आणि दोन मुली आहेत. मोठी मुलगी तारकेश्वरी 10 वीत, तर लहान मुलगी जान्हवी 8 व्या वर्गात शिक्षण घेत आहेत. पतीच्या निधनामुळे वनिता व त्यांच्या दोन मुलींवर मोठा आघात निर्माण झाला आहे. पक्षाच्या विविध जनआंदोलनात सहभागी होऊन जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसैनिकाच्या निधनामुळे मनाला वेदना पोहचलेले अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आपल्या शेकडो शिवसैनिकांसह चांभार्डा गावात जाऊन मृतक शिवसैनिक रामदास ठाकरे यांच्या कुुंटुंबियांची भेट घेतली. मृतक शिवसैनिकाची पत्नी, दोन मुली व कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करीत खचून जाऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे असे सांगून धीर दिला.

मृतक रामदास ठाकरे हे अल्पभूधारक शेतकरी होते. घरची आर्थिक स्थिती हलाखीची, मुलींचे संगोपण व शिक्षणाचा खर्च या चिंतेत कुटुंब सापडले असतांना अरविंदभाऊ कात्रटवार यांनी कुटुंबाला मोठा धीर दिला. शेतीच्या संपुर्ण मशागतीच्या खर्चाबरोबर कुटुंबाला जीवनवाश्यक साहित्य आणि दोन्ही मुलींच्या शिक्षणाचा भार उचलीत मोठी जबाबदारी स्विकारली. अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आपल्या एका छोट्या शिवसैनिकाच्या कुटुंबियाप्रती दाखविलेली आत्मीयता आणि मानवतेमुळे उपस्थित शिवसैनिक व नागरिकांचे डोळे आनंदाने पाणावले.

याप्रसंगी यादवजी लोहंबरे, गोपाल मोगरकर, प्रशांत ठाकुर, दिलीप वलादे, स्वप्नील जुमनाके, विनोद चापले, अतुल जुमनाके, राजेंद्र खेडेकार, जयदेव मेश्राम, दिलीप आवारी, गुलाब शेरकी, गुरूदास कोडाप, महेश खेडकार, प्रफुल मेश्राम, साहिल कोसमशीले, दीपक कोसमशीले, भूषण शेरकी, हरिदास रामटेके, सुनील कोसमशीले, मनोहर कोसमशीले, पुरुषोत्तम आवारी, राजेंद्र मेश्राम, पुरुषोत्तम कुमरे, नवनाथ नरुले, मयूर मेश्राम, आशिष निकुरे, जीवन उसेंडी, रामू सलामे, अमित आवारी, यादव चौधरी, मुखरू मलोडे, जीवन कुरुडकर, देवेंद्र वलादे, अमित हुलके, अजय सेलोटे, आशिष शेडमाके, गिरीष टेकाम, सचिन मडावी, मधुकर बावणे, सूरज वलादे, गंधर्व वलादे, वामन नैताम, दीपक लाडे, ओमारी भैसारे, राहुल सावरकर, अक्षय ठावरे, देवेंद्र मुळे, गणेश ठाकरे, आकाश मुंडरे, आशिष मुरतेली, साहिल निकुरे, त्रिशूल ठाकरे, प्रकाश भजभुजे, अक्षय समर्थ, आकाश मडावी, एकनाथ वाळके, अजय राऊत, राकेश वाघाडे, अमित चौधरी, प्रशांत पेंद्राम, युजीन चौधरी, गुणेश गुंटीवार, खुशाल कारेते, शुभम चंद्रगिरे, सचिन चौधरी, आरिफ ढवळे, साहिल कारेते, गौरव घुबडे, स्वप्नील मांडवकर, विलास ढोलणे, प्रणय सोरते आदी शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.