ताज्या घडामोडी

तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव * संताजी सोशल मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

एव्हीबी न्यूज गडचिरोली  :- संताजी सोशल मंडळाच्या वतीने इयत्ता 10 व 12 वी तसेच नर्वोदय स्कॉलरशिप प्राप्त व वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळयाचे आयोजन  8 जून रोजी  करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रा. देवानंद कामडी होते. उद्घाटक प्रमोद तरारे अध्यक्ष महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण मुंबई तथा माजी धर्मादाय आयुक्त यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून

प्रमुख अतिथी व मार्गदर्शक माननीय डॉक्टर रामचंद्र वासेकर सहाय्यक प्राध्यापक महात्मा गांधी महाविद्यालय सावली प्रमुख अतिथी माननीय भाग्यवानजी खोब्रागडे अध्यक्ष किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्था आरमोरी नरेंद्र तरारे नागपूर]विठ्ठलराव कोठारे सचिव संताजी मंडळ,  प्रभाकर वासेकर अध्यक्ष संताजी समिती प्रतिष्ठान ,  प्रमोदजी पिपरे अध्यक्ष प्रांतिक तैलीक महासंघ,  सुरेश भांडेकर अध्यक्ष विदर्भ तेली महासंघ,   गोपीनाथ चांदेवार भास्करराव ठाकरे उपस्थित होते

सर्वप्रथम संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली स्वर्गीय श्रावणी तरारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ बीपीएल मधील तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी एकवीस हजार रुपये पारितोषिक देण्यात आले तसेच भास्करराव ठाकरे सुरेश भांडेकर यांच्यातर्फे सहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1100 रुपये रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले तसेच दहावी व बारावी नवोदय व स्कॉलरशिप व एमबीबीएस येथील गुणवत्ता प्राप्त 65 विद्यार्थ्यांना शिल्ड प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पाच ज्येष्ठ नागरिकांचा शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला

मार्गदर्शक डॉक्टर रामचंद्र वासेकर म्हणाले की विद्यार्थ्यांनी ध्येय समोर ठेवून आपली आवड लक्षात घेऊन आपले करिअर करावे उच्चशिक्षित होऊन नोकरी करीत असतानाच समाजाची सुद्धा सेवा करावी विद्यार्थ्यांनी अनेक चांगल्या व्यक्तीचे प्रेरणा देऊन आपण उच्चशिक्षित व्हावे असे म्हणाले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक देवानंद कांमडी तर सूत्रसंचालन विठ्ठलराव कोठारे तर आभार सुधाकर लाकडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संताजी मंडळाचे सदस्य तसेच संताजी महिला मंडळाचे सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाला बहुसंख्य समाज बांधव गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.