सामाजिक

 शिवसैनिकाच्या वै़द्यकीय शस्त्रक्रियेची अरविंद कात्रटवार यांनी स्विकारली जबाबदारी !  * अपघातात पायाला गंभिर दुखापत झालेल्या  मंगेश मोंगरकर या शिवसैनिकाच्या घरी जाऊन कुटंबियाला दिला आधार…  * शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती सेवाभाव दिन म्हणून साजरी.

सेवाभावातूनच जीवनाची सार्थकता :- अरविंदभाऊ कात्रटवार यांचे प्रतिपादन..

 

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- निस्वार्थ व स्नेहभाव जोपासून केलेले कार्य कधीही व्यर्थ जात नाही. कठीण प्रसंगात एकमेकांच्या मदतीला धावून जाणे हाच खरा मानवर्ध आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची प्रेरणा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मासाहेब ठाकरे यांचा आदर्श जोपासून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंद कात्रटवार यांनी अपघातात पायाला गंभिर दुखापत झालेल्या बेलगाव येथील मंगेश आनंदराव मोंगरकर या शिवसैनिकाच्या घरी जाऊन त्याच्या वै़द्यकीय शस्त्रक्रियेची जबाबदारी स्विकारीत कुटंबियाला आधार दिला.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ८० टक्क्के समाजकारण व २० टक्के राजकारण या धोरणानुसार शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या सेवाभाव उपक्रमांतर्गत स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची जंयती सेवाभाव दिन म्हणून साजरी करण्यात आली. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते मंगेश मोंगरकर हे दुचाकी अपघातात जखमी झाले. त्यांच्या पायाला गंभिर दुखापत झाली. उपचारासाठी अधिक खर्च येत असल्याने कुटुंबियांसमोर संकट उभे ठाकले होते. सदरबाब अरविंद कात्रटवार यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वातंत्रविर सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून आपल्या शेकडो शिवसैनिकासंह बेलगाव गाठले. शिवसैनिक मोंगरकर यांची आस्थेने विचारपूस करीत माझा शिवसैनिकाच्या कुटुंबियाला वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही देत मोंगरकर कुटुंबाला आधार दिला. मंगेशच्या पायाची दुखापत दुरूस्त होण्यासाठी वैद्यकीय शस्त्रक्रियेची जबाबदारी स्विकारली. अरविंद कात्रटवार यांनपी जबाबदारी स्विकारून आपल्या शिवसैनिकाला जगण्याचे बळ दिल्याने शिवसैनिक मंगेश व त्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित शिवसैनिकांच्या डोळयात आंनदाश्रू पाणावले.

याप्रसंगी यादवजी लोहंबरे, संजय बोबाटे, गोपाल मोगरकर, प्रशांत ठाकुर, दिलीप वलादे, प्रमोद आवारी, मंगल भरणे, संदिप हर्षे, तुषार बोरकर, निखील आवारी, प्रविण आवारी, दिपक कोसमशिले, रोशन आवारी, आदित्य भरणे, अजिंक्य नगराळे, साहिल कोसमशिले, राहुल सावरकर, विलास ढोलणे, मनोज मांडवकर, विनोद जांभुळकर, अमोल भैसारे, प्रकाश भैसारे, आनंदराव सोरते, लोमेश कुमरे, रामदास ठाकरे, उमेश चापले, पराग कुमरे, सौरभ कोलते, मोहित लाजुरकर, अमिन चौधरी, प्रशांत पेंद्राम, गुणेश गुंटीवार, युजिन चौधरी, आरिफ ढवळे, रोशन कारेते, प्रेमानंद जनबंधु, साहिल कारेते, नयन कारेते, तन्मय झंझाळ, मधुकर बावणे, सचिन मडावी, पियुष सेलोटे, रंजित वलादे, अजय सेलोटे, देवेंद्र वलादे, आशिष शेडमाके, प्रकाश भजभुजे, अजीत समर्थ, अजय राऊत, तेजस समर्थ, विशाल बोरकर, साहिल बांबोळे, प्रज्वल बोरकर, सुमित डोंगरे, राजेंद्र मेश्राम, धनराज टेंगे, मयुर मेश्राम, नवनाथ नरुले, आकाश कोडवते, जीवन उसेंडी, गणेश ठाकरे, मोरेश्वर वलादे, आशिष मुरतेली, अभिषेक करकाडे, विलास नैताम, स्वप्निल जुमनाके, विलास उंदिरवाडे, रमेश ढवळे, पुरुषोत्तम उंदिरवाडे, विलास भैसारे आदि शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.