क्राईम
धान खरेदी घोटाळा ; आतापर्यंत 13 जणांना अटक * * महामंडळाच्या उपप्रादेशिक व्यवस्थापकसह अन्य तिघे फरारच

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या धान खरेदीत ४ कोटीचा घोटाळा करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्यांपैकी 13 जणांना अटक करण्यात आली असून आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक व्यवस्थापकसह अन्य तिघांचा पोलीसांना अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही.
यापुर्वी १८ एप्रिल रोजी प्रभारी विपणन अधिकारी चंद्रकांत ज्ञानेश्वर कासारकर व विपनण निरिक्षक तथा ग्रेडर हितेश पेंदाम यांना पोलीसांनी अटक केली होती. धान खरेदी घोटाळा प्रकरणात १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे व अन्य दोघे फरार आहेत. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ करीत आहेत.