गडचिरोली जिल्हा सहकारी बॅंकेला वैकुंठभाई मेहता पुरस्कार जाहीर ! * इंटरनेट बॅंकीग सुविधेचा परवाना प्राप्त झालेली सहकार क्षेत्रातील महाराष्ट्रातील पहिली व देशातील आठवी बॅंक * राज्यातील अग्रगण्य बॅंक म्हणून ओळख* * 4 हजार कोटीच्या व्यवसायाकडे वाटचाल

AVB NEWS गडचिरोली :- गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेने आदिवासीए ग्रामीण भागातील ग्राहकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन यशस्वी वाटचाल केली असल्यामुळे दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन मुंबई २०२३.२४ या वर्षाचा कै वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जाहीर झाला आहे.
जिल्हा बँकांना विविध पुरस्कार देताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्डने ठरवून दिलेल्या आर्थिक निकषानुसार प्रामुख्याने सीआरएआरए एनपीएचे प्रमाण नफा व दर आर्थिक वर्षात होणारी व्यवसाय वृध्दी आदी निकषास पात्र असणाऱ्या जिल्हा बँकांना आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते. दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मागील ३९ वर्षांपासून बँकेच्या ५७ शाखांच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील लोकांना बँकींग सुविधा पुरवित असून बँकेने ग्राहकांकरीता मोबाइल बँकींग आयएमपीएस व युपीआयई अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक निकषाला पात्र राहून गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इंटरनेट बँकींग सुविधेचा परवाना प्राप्त झालेला असून इंटरनेट बँकींग परवाना प्राप्त झालेली महाराष्ट्रातील पहिली व देशातील आठवी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठरली आहे.
सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवारांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर
चंद्रपूर जिल्हा बँकेचे विभाजन होऊन १९८५ ला दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना झाली. त्यावेळेस बँकेच्या जिल्ह्यात फक्त १४ शाखा कार्यरत होत्या व बँकेचा एकूण व्यवसाय फक्त ६ कोटी ६० लाख रुपयांचा होताण् बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांची दुरदृष्टी व मार्गदर्शनामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासीए गरीब शेतकरी व दुर्गम भागातील लोकांना बँकींग सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात टप्याटप्याने शाखा विस्तार करण्यास सुरुवात केली. आजमितीस जिल्ह्यात बँकेच्या ५७ शाखांपर्यंत विस्तार झालेला असून बँकेच्या जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील कोटगुल ते विठ्ठलरावपेठा या भागात बँकेच्या शाखा कार्यरत आहेतण् त्याचप्रमाणे हेडरीसारख्या अतिदुर्गम भागात बँकेने ग्राहकांना एटीएम सुविधा सुरु केलेली आहेण् बँक ३९ एटीएमच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४ए३०ए००० खातेदार बँकेशी जुळलेले असून यावरुन बँकेची विश्वसनीयता दिसून येते.
३१ मार्च २०२५ च्या आर्थिक स्थितीवर बँकेने ३८८१ कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केलेला असून बँक ४००० कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल करीत आहेण् बँकेचा ग्रॉस एनपीए ०ण्९५ टक्के असून बँकेचा नेट एनपीए शुन्य टक्के आहेण् महाराष्ट्रातील ३१ जिल्हा सहकारी बँकामध्ये सर्वात कमी एनपीएचे प्रमाण असलेली एकमेव जिल्हा बँक आहे यावरुन बँकेची आर्थिक सक्षमता दिसून येत आहे
गडचिरोली जिल्हा बँकेला मागील प्राप्त झालेले राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून इंटरनेट बँकींगचा परवाना प्राप्त झालेली महाराष्ट्रातील पहिली व देशातील आठवी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकए महाराष्ट्रातील ३१ जिल्हा सहकारी बँकांमध्ये सर्वात कमी एनपीएचे प्रमाण असणारी एकमेव जिल्हा सहकारी बँकए मागील सतत १० वर्षांपासून कासा डिपॉझीटचे असणारी महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा सहकारी बँकए बचत व चालु ठेवीचे प्रमाण ७० टक्केए १२ वेळा राज्यस्तरीय श्वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकश् पुरस्काराने सन्मानितए ८ वेळा राष्ट्रीय स्तरावरील श्बँको ब्ल्यु रिबनश् पुरस्काराने सन्मानितए महाराष्ट्र शासनातर्फे श्सहकार निष्ठश् राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानितए नाबार्डतर्फे वित्तीय समावेशन कार्यक्रमाअंतर्गत उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानितए महाराष्ट्र शासनातर्फे स्वयंसहाय्यता बचतगटाच्या कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान पुरस्काराने सन्मानितए ११ वेळा नाबार्डतर्फे स्वयंसहाय्यता बचतगट.बँक संलग्नता कार्यक्रम अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानितए माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल बँकींग फ्रंटीअर्सतर्फे ४ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितए बँकेला कैण् वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष प्रांचीत पोरेड्डीवार उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी मानद सचिव अनंत साळवे बँकेचे सर्व संचालक व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी आभार मानले आहे