गुणवंत (टॉपर) विद्यार्थ्यांनी यशोशिखर गाठून जिल्हयाचा नावलौकिक वाढवावा… ! * शिवसेना (उबाठा) पक्षाचे अरविंद कात्रटवार यांचे प्रतिपादन..* * इयत्ता 10 व 12 च्या टॉपर विद्यार्थ्यांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सत्कार सोहळा…
* इयत्ता 10 व 12 च्या टॉपर विद्यार्थ्यांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सत्कार सोहळा...

AVB NEWS गडचिरोली :- उज्जवल देशाचे भविष्य गुणवंत युवा विद्यार्थ्यांच्या हातात आहे. शैक्षणीकदृष्टया मागासलेल्या गडचिरोली जिल्हयातील विद्यार्थी सुध्दा आता गुणवत्तेत पुढे येत आहेत. इयत्ता दहावी आणि बारावी च्या परीक्षेत सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनीतीच्या बळावर प्राविण्य प्राप्त केले. ही गडचिरोली जिल्हयासाठी गौरवाची बाब आहे. या विद्यार्थ्यानी विविध क्षेत्रात यशोशिखर गाठून जिल्हयाचा नावलौकीक वाढवावा आणि आपण ज्या मातीतून घडलो, त्या मातीशी जुळलेली नाळ तूटू देऊ नये, असे प्रतिपादन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंद कात्रटवार यांनी केले.
केंद्रीय माध्यमिक मंडळ व राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 10 व 12 वीच्या परीक्षेतील ‘टॉपर’ विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज 20 मे रोजी आयोजीत करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अरविंदभाऊ कात्रटवार बोलत होते. याप्रसंगी अरविंदभाऊ कात्रटवार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करीत पुढील शैक्षणिक वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
अरविंद कात्रटवार पुढे म्हणाले की, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख . आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार शैक्षणिक उपक्रमांतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आला. पुर्वीपेक्षा आता गडचिरोली जिल्हयातील शैक्षणिक क्षेत्रात मोठा बदल घडून येत आहे. पुर्वी केवळ शहरी भागातील विद्यार्थ्यांचा बोलबाला असायचा. आता मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सुध्दा परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आम्ही सुध्दा गुणवत्तेत मागे नाही हे दाखवून दिले आहे. कठोर मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि कुटुंबाचे सहकार्य मिळाल्यास कुठलाही विद्यार्थी शिक्षणात मागे राहणार नाही, असेही अरविंद कात्रटवार म्हणाले. भविष्यात कोणत्याही आर्थिकदुर्बल विद्यार्थ्यांना मदतीची गरज भासल्यास शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा शिवसैनिक म्हणून मदतीसाठी सदैव तत्पर आहे, असे अरविंद कात्रटवार म्हणाले.
गुणवंत विद्यार्थ्यांनी उराशी बाळगले ध्येय !
सत्कार कार्यक्रमाप्रसंगी टॉपर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करतांना आपल्या इच्छा आकांक्षा बोलून दाखविली. राज्य बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत जिल्हयाून प्रथम आलेल्या वसंत विद्यालयाचा आयूष सचिन ब्राम्हणावाडे आणि वेदांत भंडारे यांनी डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त केली. योगेश्वरी क्षिरसागार या विद्यार्थीनीने युपीएससी परीक्षेची तयार करून भारतीय प्रशासकीय सेवेत जाणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर एमसीव्हीसी शाखेचा विद्यार्थी राहुल मुरतेली यांनी सुध्दा चांगल्या क्षेत्रात ‘करिअर’ घडविडण्याची आकांक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी यादवजी लोहंबरे, संजय बोबाटे, गोपाल मोगरकर, प्रशांत ठाकुर, दिलीप वलादे, तेजस धंदरे, रंजीत वलादे, सचिन मडावी, मधुकर बावणे, सुरज वलादे, संदिप नरुले, मनोहर निलेकार, विशाल गुरनुले, जितेंद्र निकोडे, राजेंद्र मेश्राम, गणेश ठाकरे, अमोल चौधरी, शुभम चंद्रगिरे, आरीफ ढवळे, साहिल कारेते, रमेश आवारी, फाल्गुन समर्थ, अमर सोरते, समिर राऊत, अक्षय समर्थ, शुभम अंबादे, चुडाराम राऊत, दिपक राऊत, अजित आजबले, त्रिशुल ठाकरे, वेदांत कस्तुरे, सुरज वाघाडे, रमेश आवारी, तुमदेव आवारी, सुनिल कोसमशिले, तुषार म्हशाखेत्री, विलास ढोलणे, स्वप्निल मांडोलकर, राहुल सावरकर, विनोद पातळ, पुरुषोत्तम डोईजड, प्रणय सोरते, राजु भैसारे, पंकज राऊत, तुषार ठाकरे, साहिल निकुरे, आशिष मुरतेली, समिर पिंपळे, साहिल बारापात्रे, प्रभाकर मेश्राम, आर्यन बांबोळे, प्रणय बोरकर, लोकेश ठाकरे, संकेत बोरकर, सचिन मंगर, साहिल बांबोळे, हिमांशु चौधरी, सुमित डोंगरे, अनिकेत मेश्राम, प्रफुल बांबोळे, कुणाल म्हस्के, अजिंक्य नगराळे, रवि आवारी, तुषार म्हशाखेत्री, रोहित कुसनाके, शुभम पदा, मोहित कोसरे, नविन आवारी आदि शिवसैनिक व विद्यार्थी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
