स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरीता सज्ज व्हा ! राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे निरीक्षक अतुल वांदिले यांचे आवाहन

AVB NEWS गडचिरोली: पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार हे मागील पाच दशकांहून अधिक काळा पासून देशातील दलीत शोषीत पीडित वंचितांकरिता काम करीत आहेत. त्यांचे कार्य जनते पर्यंत पोहचवून पक्ष बळकट करा आणि पुढे होणाऱ्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ता हस्तगत करा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे निरीक्षक अतुल वांदिले यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक नुकतीच गडचिरोली शहरातील चामोर्शी रोड वरील फंक्शन हॉल मध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अतुल वांदिले राज्य सरचिटणीस तथा गडचिरोली जिल्हा निरीक्षक, राजेंद्र वैद्य चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा माजी निरीक्षक, सुरेश पोरेड्डीवार राज्य सरचिटणीस, ॲड. संजय ठाकरे राज्य चिटणीस, ओम शर्मा राज्य चिटणीस, विजय गोरडवार शहर अध्यक्ष गडचिरोली, शेमदेव चाफले ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष नईम शेख, जिल्हाअध्यक्ष अल्पसंख्यांक हुसेन शेख , परमानंद मल्लिक उपसभापती कृषीउबास चामोर्शी, महिला जिल्हाध्यक्ष संगीता राऊत, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर चिंतलवार, एनटी जिल्हाध्यक्ष सचिन चलकलवार, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष रतन मलिक युवक जिल्हाध्यक्ष हिमांशु देशमुख, युवक प्रदेश सचिव करण गण्यारपवार, प्रदेश उपाध्यक्ष विद्यार्थी ऋषभ गोरडवार,कोरची तालुकाध्यक्ष प्रताप गजभिये, महीला जिल्हा उपाध्यक्ष मीनल चिमुरकर, जिल्हा सचिव ऋतुजा कन्नाके, विधानसभा अध्यक्ष राजू आत्राम, जिल्हा जिल्हा को–आप बँक संचालक अमोल गण्यारपवार,वडसा तालुकाअध्यक्ष क्षितिज उके, गडचिरोली तालुका अध्यक्ष मनोहर भोयर, चामोर्शी तालुकाध्यक्ष कबीर आभारे, मुलचेरा तालुकाध्यक्ष अशोक आडके, अहेरी तालुकाध्यक्ष रमेश चुक्कावार, जिल्हा उपाध्यक्ष सत्यनारायण गुप्ता, सिरोंचा तालुकाध्यक्ष सागर मूलकला,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार बोलतांना म्हणाले की, आपल्या पक्षाची भुमिका ही विकासाभिमुख असून, दिवंगत आर आर पाटील या जिल्ह्याचे पालक मंत्री असताना जिल्ह्यातील तळागाळातील लोकांकरीता हजारो करोड रुपयाचा निधी आणून जिल्ह्यातील शेतकरी, युवक, महिला, जेष्ठ नागरिकांच्या विकासा करीता काम केला मात्र जिल्ह्यात त्यांच्या नंतर विकास थांबलेला आहे असे सांगितले या नंतर राजेंद्र वैद्य, सुरेश पोरेड्डीवार यांचीही भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय गोरडवार यांनी केले तर सुत्र संचालन शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष मुरलीधर नागोसे तर आभार सुरेश परसोडे किसान सेल जिल्हाध्यक्ष यांनी केले, यावेळी भास्कर निमजे,सुनील कत्रोजवार, नईमा हुसेन, विमल भोयर, सुरेश नैताम, नीलेश कोटगले, गुलाब धोती, गुलाब मोडले, सुधाकर निखाडे, गोसावी सातपुते, शामराव पोरटे, मोरेश्वर चलकलवार, पंचरंग मंडल,यांचे सह माजी नगरसेवक, रामनाथ कोरचा, विजया बोगा, राहुल पुसतोडे, मुरलीधर बुरे,माजी पंचायत समिती सदस्य, माजी जी प सदस्य, तथा जिल्हा कार्यकारीनी सदस्य व बाजार समिती संचालक, खरेदी-विक्री संचालक,शेकडो कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.