चामोर्शीत भिषण अपघातात चौघांचा मृत्यू : * ट्रकने कारला चिरडले, मृतांमध्ये गडचिरोली शहरातील तिघांचा समावेश
भाजपाचे माजी शहराध्यक्षाच्या भावाचा समावेश

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- यु -टर्न घेतांना कारला मागून येणाया ट्रकने जोरदार धडक दिल्याने कारमधील तिघांचा जागीच, तर एकाचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हदयद्रावक घटना आज रविवार 18 मे रोजी घडली. अपघाताची घटना चामोर्शी येथील उपजिल्हा रूग्णालया जवळ दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. अपघाताची भिषण एवढी होती की कारचा चेंदामेंदा होउुन तिघांचा घटनास्थळीच तर एकाचा गडचिरोली येथील रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृतकांमध्ये तिघे गडचिरोली शहरातील, तर एक जण चामोर्शी येथील रहीवाशी आहे. मृतकामध्ये गडचिरोली शहरातील आठवडी बाजारातील विनोद पुंजाराम काटवे ( 45), राजू सदाशिव नैताम( 45), सुनिल वैरागडे (५५) आणि चामोर्शी येथील अनिल मारोती सातपुते (५०) यांचा समावेश आहे. विनोद काटवे हे भाजपाचे माजी शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांचे छोटे बंधू आहेत.ट्रकचालक फरार झाला असून पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक कादबने करीत आहेत.