जिल्हा

उद्या शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने ‘टॉपर’ विद्यार्थ्यांचा होणार सत्कार  *इयत्ता 10 व 12 वी च्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा  * गुणवंतांनी उपस्थित राहण्याचे अरविंद कात्रटवार यांचे आवाहन

AVB NEW गडचिरोली  :- केंद्रीय शिक्षण मंडळ व राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 10 व 12 वीच्या परीक्षेत गडचिरोली जिल्हयातील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे.
परीक्षेत जिल्हयातून ‘टॉपर’ आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने  उद्या 20 मे रोजी सकाळी 11 वाजता अरविंदकात्रटवार यांच्या चामोर्शी मार्गावरील जनसंपर्क कार्यालयात आयोजीत करण्यात आला आहेे.

याप्रसंगी  इयत्ता दहावी आणि बारावी सीबीएससी व राज्य बोर्डाच्या परीक्षेत जिल्हयातून टॉपर’ आलेल्या गुणवंतांचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते भेट वस्तू व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तरी टॉपर आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने यादवजी लोहंबरे यांनी केले आहे.

या विद्यार्थ्यांचा होणार सत्कार

वर्ग 12 वी कला शाखा
1 नेहा रमेश सोनटक्के 88.83 टक्के, शिवाजी महाविद्यालय गडचिरोली
2 खुशाल राउुत 88 टक्के, शिवाजी महाविद्यालय गडचिरोली
………………………………..

वर्ग 12 वी विज्ञान शाखा
1 शरयू विलास ढोरे 92 टक्के, महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय देसाईगंज
2 स्नेहांशू सुजीत सरकार 91.17 टक्के, नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय सुंदरनगर , मुलचेरा
3 संजना कालीदास पदा 90.67 टक्के, शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली
4 जागृती जगदीश मेश्राम 89.83 टक्के, स्वामी विवेकानंद ज्यनिअर कॉलेज गडचिरोली
5 प्रिन्स रविंद्र वडेट्टीवार 89.83 टक्के, राजश्री शाहू महाराज स्कुल ऑपफ सायन्स चामोर्शी
………………………….
वर्ग 12 वी एमसीव्हीसी शाखा
1 मदीहानाज मेहबुबखॉन पठाण 85.67 टक्के, शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली
2 राहुल जीवनदास मुरतेली 79.50 टक्के, सिंधुताई पोरेड्उीवार कॉलेज गोगाव
…………………..
वर्ग 12 वी सीबीएसई सेंट्रल बोर्ड
1 प्रांजन कुंभमवार 97.83 टक्के, नवोदय विद्यालय घोट
2 अनघा दिकोंडावार 95.50 टक्के, नवोदय विद्यालय घोट
3 जानवी बुध्दे 92.67 टक्के, नवोदय विद्यालय घोट
4 प्राची निकोडे 92.17 टक्के, नवोदय विद्यालय घोट
5 फाल्गुनी सहारे 90.20 टक्के, स्कुल ऑफ स्कॉलर गडचिरोली
…………………………………….
वर्ग 10 वी राज्य बोर्ड परीक्षा
1 आयुष सचिन ब्राम्हणवाडे 97.60 टक्के, वसंत विद्यालय गडचिरोली
2 समर मनोज खोबे 96 टक्के, गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली
3 धनश्री आलाम 95.80 टक्के, शिवाजी अकॅडमी गडचिरोली
4 योगेश्वरी क्षिरसागर 93.60 टक्के, वसंत विद्यालय गडचिरोली
5 वेदांत भंडारे 93.40 टक्के, वसंत विद्यालय गडचिरोली
……………………….
वर्ग 10 वी सीबीएससी केंद्रीय बोर्ड
1 शौर्य सुधाकर रायपुरे 97.20 टक्के, प्लॅटीनम ज्युबली स्कुल गडचिरोली
2 सुष्मीत कौर सुलूजा 96.80 टक्के, ग्लोबल मिडीया केरला स्कुल आलापल्ली
3 प्रणव भोंगळे 96.33 टक्के, नवोदय विद्यालय घोट
4 अर्जुन मोडक 96.20 टक्के, प्लॅटीनम ज्युबली स्कुल गडचिरोली
5 एंजल वाळके 95.80 टक्के, कारमेल स्कुल गडचिरोली

 

 

 

 

 

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.