जगाला युध्दाची नव्हे, तर बुध्दांची गरज… ! * शिवसेना (उबाठा) पक्षाचे अरविंद कात्रटवार यांचे प्रतिपादन… * बुध्द जयंती निमित्य मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील उपासिका माता भगिनींना वस्त्रभेट..
भगवान बुध्दांच्या शिकवणूकीतून सुखी जीवनाचा मार्ग

एव्हीबी न्यूज गडचिरोली :-
भगवान गौतम बुध्दांनी जगाला शांती, अहिंसा, समानतेचा संदेश दिला. बुध्दांनी हिंसा अंधविश्वास आणि अधर्माच्या बंधनातून जनतेला मुक्त केले. त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर संपुर्ण विश्वात आपल्या ज्ञानाने ज्योत पेटवली. भगवान बुध्दांची शिकवण सुखी जीवनाचा मार्ग असून त्यांनी दाखविलेल्या मार्गावर सर्वांनी वाटचाल केल्यास विश्वात शांती नांदेल आणि सर्वागीण विकास घडून येईल. असे प्रतिपादन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंद कात्रटवार यांनी केले.
बुध्द जयंतीचे औचित्य साधून मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांमधील बौध्द समाजातील शेकडो उपासिका माता भगिनींना वस्त्रभेट देण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी अरविंद कात्रटवार बोलत होते.
अरविंद कात्रटवार पुढे म्हणाले की, ज्या प्रमाणे मानवाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते त्याच प्रमाणे प्रज्ञेचीही आवश्यकता असते. शिक्षण हे केवळ पैसा कमाविण्याचे साधन नसून ते व्यक्तीच्या दु:खाचा अंत करणारे शस्त्र आहे हे आज च्या युवा पिढीमध्ये रूढ होण्याची गरज आहे. बुध्द केवळ एक धर्म म्हणून नव्हे तर जीवन जगण्याचा मार्ग आहे. बुध्दांनी दिलेल्या मुल्यांची व विचारसणीची वैज्ञानिक दृष्टीकोणातून समज करून आजच्या पिढीने स्वावलंबी बनून आदर्शवादी जीवन जगण्याची आवश्यकता आहे. असे अरविंद कात्रटवार म्हणाले.
मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात मुरमाडी, गिलगाव, आंबेशिवणी, अमिर्झा, अमिर्झाटोली, टेंभा, कळमटोला, आंबेशिवणी, आंबेटोला, आंबेशिवनी टोली या गावात मोठ्या प्रमाणात बौध्द समाज बांधव गुण्यागोविंदाने राहात. या समाजाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी आपण कटीबध्द आहे. भगवान गौतम बुध्दांनी समस्त मानवजातीला चांगले कर्म करण्याचा संदेश दिला. आपल्या हातून सुध्दा सत्कार्य घडावे आणि सामाजिक बांधीलकी जोपासून उपासीका माता भगिनींना वस्त्रभेट देण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. सेवाभाव जोपासून केलेल्या कार्याचा आनंद अलौलिक आहे. बौध्द समाजबांधवांच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर आहे, असे अरविंद कात्रटवार म्हणाले. वस्त्रभेट कार्यक्रमाप्रसंगी उपासिका माता भगीनींली आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी यादवजी लोहंबरे, दीपक लाडे, दिलीप वलादे, गोपाल मोंगरकर, प्रशांत ठाकूर, अजिंक्य नगराळे, कुमदेव आवारी, अमीन उलके, राहुल सावरकर, वसंत नगराळे, कैलास फुलझेले, रमेश फुलझेले, माणिक फुलझेले, तुषार बोरकर, मोहन डोंगरे, उमेश फुलझेले, भैया फुलझेले, मोरेश्वर फुलझेले, हरिदास रामटेके, गोकुल डोंगरे, अरविंद जांभुळकर, रेवनाथ उंदिरवाडे, नागोजी नंदेश्वर, विशाल भगत, कमलाकर टेंभुर्णे, प्रकाश जांभुळकर, सुरेश उंदिरवाडे, देवेंद्र जांभुळकर, सुनिल उंदिरवाडे, प्रफुल जांभुळकर, प्रफुल उंदिरवाडे, रोशन जांभुळकर, रामभाऊ बाबनवाडे, अतुल राऊत, संजय मेश्राम, सुरेखा खंडारे, गणेश खंडारे, माणिक भैसारे, भुमिका भैसारे, कृष्णाजी खंडारे, जयमाला खंडारे, मीनाताई खंडारे, हरिश्चंद्र खंडारे, सुभाष खंडारे, ज्योती खंडारे, नरेंद्र खंडारे, संगीता खंडारे, चिंतामण खंडारे, गोपीनाथ उंदीरवाडे, आशा उंदीरवाडे, जीवन नंदेश्वर, सुनीता नंदेश्वर, रुपेश उंदीरवाडे, सचिन नंदेश्वर, बळीराम उंदीरवाडे, जिजाबाई उंदीरवाडे, ताराचंद उंदीरवाडे, कल्याणी उंदीरवाडे, जयदेव राऊत, पुष्पा राऊत, सूरदास भैसारे, विमल भैसारे, प्रवीण भैसारे, राहुल भैसारे, शिल्पा भैसारे, रुखमाबाई भैसारे, सचिन नंदेश्वर, तुलाराम उंदीरवाडे, शालुताई उंदीरवाडे, मारोती टेंभूर्णे, लताबाई टेंभूर्णे, गुलाब टेंभूर्णे, रीना टेंभूर्णे, किशोर राऊत, अक्षरा राऊत, सिद्धार्थ जनबंधु, घनश्याम टेंभूर्णे, सुलिंदा टेंभूर्णे, जगदीश टेंभूर्णे, धूर्वाजी राऊत, सुमित्रा राऊत, शालिना राऊत, केसरी भोयर, रमेश ठाकरे, सुधीर भोयर, मेघश्याम उंदिरवाडे, गणेश उंदिरवाडे, संजय भैसारे, राहुल भैसारे, नाजूक उंदिरवाडे, विलास भैसारे, विलास उंदिरवाडे, निखिल भैसारे, रमेश ढवळे, सुधाकर ढवळे, चिंतामण चौधरी, चुडीराम सहारे, यशवंत राऊत, प्रशांत जनबंधू, प्रशांत साखरे, बंडू राऊत, शरद भैसारे, गजानन सहारे, सुनीता राऊत, सिंधुबाई जनबंधू, भूमिका बोदेले, दिपक लाडे, राहुल सावरकर, कैलास लाडे, प्रमोद उंदिरवाडे, प्रविण टेंभुर्णे, विलास ढोलणे, सुधाकर उंदिरवाडे, सुरज धाकडे, प्रभा लाडे, सागर धाकडे, काशीबाई ढोलणे, जास्वंदा ढोलणे, रुपाली भैसारे, कल्याणी भानारकर, विद्या भानारकर, सिद्धार्थ सोरते, अजय भानारकर, मनोज भानारकर, मोतीराम उंदिरवाडे, तुळशिराम टेंभुर्णे, प्रकाश भैसारे, मनोज सोरते, तुलाराम जांभुळकर, कमलाकर उंदिरवाडे, खुशाल ढोलणे, सोनु भानारकर, जना सोरते, भूमेश्वर अंबादे, सोमेश्वर सहारे, तुळशीदास सोरते, प्रदीप सोरते, सुरेश वाघमारे, आदिनाथ वाघमारे, लंकेश वाघमारे, प्रशांत ढोलणे, गोरख उंदिरवाडे, बबन वाघमारे, निकुंज सहारे, अक्षय ढवळे, बबन राऊत, जिगर उंदिरवाडे, मंगेश जनबंधु, सुरज मोतीराम भैसारे, महेंद्र जनबंधू, प्रशिक भैसारे, रोशन नंदेश्वर, तन्मय ढवळे, उमेश ढवळे, गौतम सहारे, त्रिशरण राऊत, साहिल नंदेश्वर, राजिक उंदिरवाडे, अभिषेक उंदिरवाडे, प्रफुल बांबोळे, हेमंत मेश्राम, दिलीप बांबोळे, निखील बांबोळे, स्वप्नील बांबोळे, दुरंन बांबोळे, राहुल मेश्राम, प्रफुल मेश्राम, अक्षय रायपुरे, लोकेश ठाकरे, श्रावस्ती खोब्रागडे, गुरु बांबोळे, प्रदिप बांबोळे, आशिष बोरकर, अनिकेत बोरकर, जयभिम मेश्राम, स्नेहल बोरकर, अमित मुटकुरे, प्रणय बोरकर, प्रथमेश मेश्राम, वैभव बांबोळे, रोहित बांबोळे, हितेश बांबोळे, हेमंत डोंगरे, संकेत बोरकर, अनिकेत मेश्राम, आर्यन बांबोळे, प्रज्वल बोरकर, स्मित मेश्राम, विशाल बोरकर, साहिल बोरकर, साहिल बांबोळे, सुमित डोंगरे, भिमराव मेश्राम आदी शिवसैनिक व बौद्ध उपासक – उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
