धान खरेदी घोटाळा ; आणखी ५ जणांना अटक * अटकेतील आरोपीची संख्या पोहचली ७ वर

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- कुरखेडा तालुक्यातील देउुळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या धान खरेदीत ४ कोटीचा घोटाळा करण्यात आला आहे. या या प्रकरणात पोलीसांनी काल शनिवारी संस्थेच्या 5 संचालकांना अटक केली असून आतापर्यत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 7 झाली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष पतीराम कोकोडे, संस्थेचे उपाध्यक्ष पंढरी दादगाये, भाउुराव कवाडकर, नुसाराम कोकोडे व भिमराव शेंडे यां संचालकांचा समावेश आहे.
यापुर्वी १८ एप्रिल रोजी प्रभारी विपणन अधिकारी चंद्रकांत ज्ञानेश्वर कासारकर व विपनण निरिक्षक तथा ग्रेडर हितेश पेंदाम यांना पोलीसांनी अटक केली होती. धान खरेदी घोटाळा प्रकरणात १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे व आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे व्यवस्थापक महेंद्र मेश्राम फरार आहेत. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ करीत आहेत.