ताज्या घडामोडी
गडचिरोली मेडीकल कॉलेजचे ३ विद्यार्थी वैनगंगेत बुडाले !

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- चंद्रपुर गडचिरोली मार्गावरील वैनगंगेच्या नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेले गडचिरोली मेडीकल कॉलेजचे 3 विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. सदर घटना आज १० मे रोजी दुपारच्या सुमारास घडली असून शोधमोहिम सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार मेडीकल कॉलेजचे जिल्हा सामान्य रूग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत असलेले 8 विद्यार्थी सुटटीचा आनंद घेण्यासाठी आंघोळीसाठी वैनगंगा नदीपात्रात गेले होते. यापैकी तिघे जण खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. घटनास्थळ चंद्रपूर जिल्हयात येत असल्याने सावली पोलीसांकडून शोधमोहिम सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.