युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन संदर्भात आढावा * नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
गडचिरोली : सध्याच्या भारत-सीमेवरील युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध विभागांनी करावयाच्या उपाययोजना तसेच नागरिकांनी घ्यावयाची दक्षता यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन आढावा सभेचे आयोजन करण्यात आले. प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि प्रशासनाकडून येणाऱ्या सूचना पाळण्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीत विविध विभागांना आपत्कालीन परिस्थितीत सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले. पोलीस विभागाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आराखडा तयार करावा तसेच संवेदनशील प्रकल्पांची रंगीत तालीम घ्यावी, असे निर्देश देण्यात आले. आरोग्य विभागाने सर्व दवाखाने सुरू ठेवण्याची व पुरेसा औषधसाठा सुनिश्चित करण्याची जबाबदारी स्वीकारली.
नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि प्रशासनाकडून येणाऱ्या सूचना पाळण्याचे आवाहन करण्यात आले. अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा व्हॉट्सअॅप चॅनेल https://whatsapp.com/channel/0029VbAPkzTKGGG8KdTvgY41 फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत खालील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा:
जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्ष: 07132-222031, मोबाईल: 9423911077
पोलीस नियंत्रण कक्ष: 07132-223142/223149, मोबाईल: 9403801322
या बैठकीस अपर जिल्हाधिकारी श्री. नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुनील सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किन्नाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अधीक्षक अभियंता श्री. सुमित मुंधडा, नगर परिषद गडचिरोलीचे मुख्याधिकारी श्री. सूर्यकांत पिदुरकर, पोलीस निरीक्षक (DSB) श्री. निखील फटींग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. निलेश तेलतुंबडे, तसेच इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.