जिल्हा

 माता व नवजात बाळ मृत्यू प्रकरणात दोषी डाॅक्टरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.    अमिता मडावी यांची मागणी 

गडचिरोली, प्रतिनिधी :-
चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील २७ वर्षीय जिजा हंसराज सातर आणि त्यांच्या नवजात बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उपचारात कथित हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत संबंधित डॉ. किलनाके व डॉ. देवरा यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अमिता मडावी व सातर कुटुंबीयांनी केली.यासंदर्भात २४ ऑगस्ट रोजी गडचिरोली येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अमिता मडावी यांनी संपूर्ण घटनेची माहिती देत आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, जिजा सातर यांना प्रसूतीसाठी २३ ऑगस्ट रोजी पहाटे चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, गडचिरोलीला नेत असताना बाळाचा प्रसूतीपूर्वीच मृत्यू झाला. त्यानंतर प्रसूती झाल्यानंतर महिलेनेही उपचार दरम्यान तिला बाळ दगावाल्याचे स्टाफ च्या वतीने सांगितले. तिला मानसिक धक्का बसल्याने नर्स ने तिची प्रकृती क्रिटिकल झाल्याची माहिती डॉक्टरांना दिली. तरी सुद्धा या गंभीर बाबी कडे दुर्लक्ष केल्याने प्रशासन गोंधळून गेले. काही तासांनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये रेफर करण्यात आले. अखेर बाळंतीण ने प्राण सोडले.
या घटनेमुळे सातर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, वेळेत योग्य उपचार मिळाले असते तर माता आणि बाळाचे प्राण वाचू शकले ? असा सवाल अमिता मडावी यांनी उपस्थित केला. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष वैद्यकीय चौकशी करून उपचारात नेमका कुठे विलंब किंवा त्रुटी झाली, याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी त्यांनी केली.
या पत्रकार परिषदेत डॉक्टर किलनाके यांच्या वर अमिता मडावी यांनी गंभीर आरोप  केले आहे. या पूर्वी सुद्धा ते वादग्रस्त होते.
“ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींचा गंभीर प्रश्न आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी दोषींची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका अमिता मडावी यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
तसेच चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा, डॉक्टरांची उपलब्धता, प्रसूतीच्या वेळी तातडीने उपचार करण्याची व्यवस्था आणि गंभीर रुग्णांना रेफर करण्याची प्रक्रिया यांचीही सखोल तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
पत्रकार परिषदेला सामाजिक कार्यकर्त्या अमिता मडावी, मृतक महिलेचे पती हंसराज सातर, आई सोनिबाई कंगाले, जाऊ जिजाबाई लोनबले, नातेवाईक शरद काशिनाथ कस्तुरे आदी उपस्थित होते.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.