जिल्हा

श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे ७ सप्टेंबर रोजी भव्य महाअभिषेक सोहळा *** शेतकरी, युवक, महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे आवाहन

AVB NEWS गडचिरोली :: गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहनाचा मुद्दा, शेतीमालाला योग्य भाव, खतांचा प्रश्न, सिंचन, रस्ते, रोजगार, आरोग्य, महिलांच्या सुरक्षिततेसह जिल्ह्यातील अनेक मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित आहेत. या प्रश्नांची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निराकरण करावे, यासाठी शेतकरी संघर्ष कृती समिती, गडचिरोली च्या वतीने श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे भव्य महाअभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी,  ७ सप्टेंबर २०२६ रोजी श्री मार्कंडेश्वर महादेवाचा महाअभिषेक करण्यात येणार असून या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी, युवक, महिला आणि नागरिकांच्या विविध समस्या मार्गी लागाव्यात, शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती मिळावी, यासाठी श्री मार्कंडेश्वर चरणी प्रार्थना करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि जिल्ह्यातील हक्काच्या प्रश्नांसाठी एकजुटीने उभे राहण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी महिला युवक व नागरिकांनी उपस्थित राहून या महाअभिषेक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.

यावेळी पत्रकार परिषदेला तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चामोर्शी प्रमोद भगत, जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली नेताजी गावपुरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, दिवाकर निसार, तात्याजी चीजघरे, ढिवरू मेश्राम,नदिम नाथानी, विजय लाड, अमर मोगरे, नरेंद्र कोठारे, संजय बुरांडे, गुरुदास भुर्से, दीपक दुमणे, मुखरू शेंडे, वसंत बुरमवार, विलास भोयर, पांडुरंग दरडे, मनोहर शेंडे, गंगाधर बोमनवार, सचिन निर्मलवार, नीलकंठ हजारे, संतोष पाल,गौरव येणप्रेड्डीवार, साहिल वडेट्टीवार, प्रफुल बरसागडे, तेजस कोंडेकर कालिदास पेंदाम, गुरुदास ठाकरे,रोहिदास मेश्राम, सुनील कोहपरे, मारुती चौधरी, जानकीराम पोरेटे, अनिल कुमरे, तुकाराम गांधरवार, तोताजी जेंगठे, भक्तदास भगत, शामराव खोब्रागडे, मुखरू शेंडे, नेहल आभारे, विपुल एलटिवार सह शेतकरी बांधव उपस्थित होते.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.