विद्यार्थिनीला गानली समाज संघटनेचा मदतीचा हात

AVB NEWS गडचिरोली : आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे उच्च शिक्षणाची संधी हातातून जाऊ नये, यासाठी अखिल भारतीय गानली समाज संघटना, जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने गरजू विद्यार्थिनीला आर्थिक मदत करण्यात आली.
नवेगाव मूरखळा, जि. गडचिरोली येथील कु. नूतन अतुल संगीडवार हिचा शासकीय तंत्रनिकेतन, गडचिरोली येथे प्रवेशासाठी नंबर लागला होता. मात्र, घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे प्रवेशासाठी आवश्यक असलेली रक्कम भरणे तिच्यासाठी अडचणीचे झाले होते. त्यामुळे तिने आर्थिक मदतीसाठी अखिल भारतीय गानली समाज संघटनेकडे अर्ज केला होता.
विद्यार्थिनीची परिस्थिती लक्षात घेऊन समाजातील पदाधिकारी व समाजबांधवांनी एकत्रितपणे 12 हजाराची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. ही मदत विद्यार्थिनीच्या घरी जाऊन प्रत्यक्ष देण्यात आली.
यावेळी संघटनेच्या वतीने तिच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच, तिचा प्रथम वर्षाचा निकाल समाधानकारक लागल्यास पुढील शिक्षणासाठीही शक्य ते सहकार्य करण्यात येईल, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी नितीन संगीडवार, स्नेहल भाऊ संतोषवार, प्रवीण भाऊ चन्नावार, विपुल भाऊ चन्नावार, अतुल भाऊ नागूलवार, कमलाकरजी वडेट्टीवार, शंकरराव कस्तुरवार, अशोकभाऊ चन्नावार, नरेंद्र (बालू)भाऊ चन्नावार, नंदूभाऊ गुंडावार, जयंत भाऊ बल्लमवार, निकेतन भाऊ गधेवार, रवीभाऊ चन्नावार, ममताताई कोतपल्लीवार, प्रशान्त सा. पोरेड्डीवार, अशोक भाऊ पोरेड्डीवार, प्रकाश भाऊ तोडेवार, श्रीनिवासभाऊ गोडशेलवार व सुरेखाताई राजेश चन्नावार यांनी आर्थिक सहकार्य केले.
मदत सुपूर्द करताना श्री नितीन संगीडवार, श्री स्नेहल संतोषवार, श्री प्रकाश तोडेवार, श्री प्रवीण चन्नावार, श्री नंदू गुंडावार व श्री राजेश चन्नावार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदत करणे हीच समाजाची खरी सामाजिक बांधिलकी असून, समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन व सहकार्य करण्याचा संघटनेचा प्रयत्न यापुढेही सुरू राहील, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.