राजकीय

सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार)  एल्गार …! धानाला बोनस, शेतकरी कर्जमाफी, स्मार्ट मीटर रद्द करण्यासह विविध मागण्यावर आंदोलनाचा इशारा

AVB NEWS गडचिरोली :-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) च्या वतीने गडचिरोली शहरातील संस्कृती सभागृहात २५ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात जिल्ह्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, बेरोजगार सर्वसामान्य नागरिकांच्या विविध आणि प्रश्नांवर सरकारविरोधात आक्रमक भूमिका मांडण्यात आली. शासनाने जनतेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात जिल्ह्यात व्यापक आंदोलन उभारण्याचा इशारा पक्षाच्च्या नेत्यांनी दिला.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे होते. माजी गृहमंत्री – अनिल देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, अॅड. हिराचंद बोरकुटे, अॅड. संजय ठाकरे, * अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्षअब्जल फारूख यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी गडचिरोली हा धान उत्पादक जिल्हा असूनही शेतकऱ्यांना अद्याप धानाचा बोनस मिळालेला नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र असून शेतीयोग्य जमीन मर्यादित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी

भव्य कार्यकर्ता मेळावा

उद्योगांसाठी संपादित करण्यास विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उद्योग उभारणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याऐवजी उपलब्ध शासकीय जमिनीचा वापर करावा. स्थानिकांच्या जमिनीवर उद्योग उभे राहत असतील, तर त्या उद्योगांमध्ये स्थानिक युवकांना रोजगाराची हमी मिळाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाढती महागाई, गॅस सिलिंडर,

पेट्रोल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याचे सांगितले. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेमुळे अनेक महिलांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पात्र महिलांना योजनेचा लाभमिळण्यासाठी शासनाने प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी त्यांनी केली.

जिल्ह्यात घडलेल्या विविध

कर्जमाफी आणि रोजगार उपलब्ध करून द्यावा – आ. शिंदे

प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी शेतकरी कर्जमाफी, धानाला बोनस, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात मूलभूत सुविधांची स्थिती सुधारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात उद्योग उभारले जात असतील, तर स्थानिकांच्या जमिनी घेऊन त्यांना रोजगारापासून वंचित ठेवता येणार नाही. स्थानिकांना रोजगाराची संधी मिळत नसेल, तर अशा उद्योगांना विरोध करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस घेईल, असा इशाराआ. शिंदेयांनी दिला. गडचिरोली जिल्ह्यात रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या मूलभूत प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि बेरोजगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्ह्यात व्यापक जनआंदोलन उ उभारण्यात येईल, असे शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

घटनांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही देशमुख यांनी केली. नीट, एमपीएससी, तलाठी आणि शिक्षक भरतीच्या परीक्षांमध्ये पेपरफुटी किंवा गैरप्रकाराचे आरोप होत असल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी भूमिका अनिल देशमुख यांनी

मांडली. विद्यार्थ्यांनी अनेक वर्षे मेहनत करून परीक्षांची तयारी केलेली असते. त्यामुळे परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता राखणे आणि विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटरचा अतिरिक्त भार पडत असल्याचा आरोप करीत स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द करण्याची मागणी मेळाव्यात करण्यात आली. सामान्य वीज

ग्राहकांच्या हिताचा विचार करून शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी भूमिका पक्षाच्या नेत्यांनी मांडली.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.