संपादकीय

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख !   स्वातंत्र्यदिन सोहळयाप्रसंगी गडचिरोली ब्रॉन्ड लोगोचे पालकमंत्री आशिष जायस्वाल यांच्या हस्ते अनावरण * पत्रकार अनिल बोदलकर यांच्या लोगो व टॅगलाईनला मिळाला प्रथम क्रमांक

AVB NEWS गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट (PG) आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO) तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध बाजारपेठीय ओळख मिळावी यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने ‘गडचिरोली’ या ब्रँडसाठी लोगो आणि टॅगलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेत शंभर पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.स्पर्धेत प्राप्त  प्रवेशिकांमधून तज्ज्ञ समितीमार्फत सर्वोत्तम लोगो व टॅगलाईनची निवड करण्यात आली

यामध्ये पत्रकार अनिल बोदलकर यांच्या लोगोला प्रथम क्रमांक, यश नंदगिरीवार यांच्या लोगोला द्वितीय, तर निखील जरूरकर यांच्या लोगोला तृतीय क्रमांक मिळाला. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन सोहळयाप्रसंगी पालकमंत्री अॅड आशिष जायस्वाल यांच्या हस्ते प्रथम क्रमांक प्राप्त लोगोचे अनावरण करण्यात आले. निवडण्यात आलेला लोगो आणि टॅगलाईन भविष्यात उमेद अंतर्गत उत्पादित वस्तूंच्या ब्रँडिंगसाठी वापरण्यात येणार आहे.

समारंभाला आमदार डॉ. मिलींद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक एम. रमेश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर , जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उमेद अभियानांतर्गत विविध स्वयं सहाय्यता समूह, उत्पादक गट आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समूहांमार्फत कृषी, प्रक्रिया उद्योग, हस्तकला, वनाधारित उत्पादने तसेच इतर विविध दर्जेदार वस्तूंचे उत्पादन केले जाते. या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्व उत्पादने एकाच ब्रँड नावाखाली विक्री करण्याचा मानस जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

आकर्षक, नाविन्यपूर्ण आणि गडचिरोली जिल्ह्याची ओळख प्रतिबिंबित करणारा ब्रँड लोगो व टॅगलाईन तयार करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत प्राप्त  प्रवेशिकांमधून तज्ज्ञ समितीमार्फत सर्वोत्तम लोगो व टॅगलाईनची निवड करण्यात आली

 

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.