आज गडचिरोलीत भव्य अशा रोकडे ज्वेलरी शोरूमचा शुभारंभ * टिव्ही स्टार शिल्पा शिंदे उपस्थित राहणार

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- पाच पिढयापासून चालत असलेल्या व मध्य भारतातील सर्वात मोठे विश्वासार्ह ज्वेलरी ब्रॅंड रोकडे ज्वेलर्स ची भव्य शोरूम गडचिरोली शहरात सुरू होत असून आज १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता या भव्य शोरूमचा उद्घाटन सोहळा मोठया उत्साहात पार पडणार आहे. उद्घाटन सोहळा चंद्रपूर मार्गावरील हॉटेल लॅन्डमार्क समोरील हॉटेल जिंजर येथे होणार आहे. शोरूमच्या उद्घाटन कार्यक्रमाला टिव्ही स्टार शिल्पा शिंदे उपस्थित राहणार आहे
रोकडे ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक राजेश रोकडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले की, हे शोरूम ग्राहकांना १०० टक्क्के हॉलमार्क असलेले सोने, डायमंड, पोलकी, कुंदन, ब्रायडल आणि चांदीच्या दागिण्यांचे एक अनोखे आणि एक्सक्लुसिव्ह कलेक्शन एकाच छताखाली उपलब्ध करून देणार आहे. विशेष म्हणजे रोकडे ज्वेलर्स सोबत अभिनेता रितेश देशमुख व जेनेजिया देशमुख जोडले गेले असून अधिकृत ब्रॅन्ड अॅम्बेसडर म्हणून घोषीत करण्यात आले आहे.
गडचिरोलीत सुरू करण्यात येत असलेले शोरूम विदर्भातील ११ वे शोरूम असून त्यामुळे स्थानिक ५० सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कर्मचारयांना नागपूरात विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. १२४ वर्षापासून रोकडे ज्वेलर्स लाखो कुटुंबासाठी विश्वासाचे प्रतिक ठरले असून पारंपारिक मुल्यांमध्ये आधुनिकता जोडून पुढे जात आहोत. गडचिरोली येथील शुभारंभाच्या उत्साहात जिल्हावायीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रोकडे ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक राजेश रोकडे व परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे
