भाजपाने जेन झी’ च्या आंदोलनातून धडा घ्यावा * पत्रकार परिषदेतून सलील देशमुख यांची स्पष्टोक्ती * भुसंपादना विरोधात गडचिरोलीत शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार

AVB NEWS गडचिरोली :– केंद्रातील भाजप सरकार बेरोजगार तरूणांच्या अपेक्षा पुर्ण करण्यात अपयशी ठरल्याने युवक वर्गांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनात जेन झी ने व्यक्त केलेला रोष ही केवळ झलक आहे. भाजपाने या आंदोलनातून धडा घ्यावा, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार पक्षाचे नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सलील देशमुख यांनी केली. ते काल 7 आॅगस्ट रोजी नागपूर पदविधर मतदारसंघाच्य नावनोंदणी अभियाना निमित्य गडचिरोलीत आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते.
पत्रकार परिषदेला पक्ष निरीक्षक हिराचंद बोरकुटे, प्रदेश सरचिटणीस प्रविण कुटे, महासचिव अविनाश गौपत, प्रदेश सदस्य संजय ठाकरे, जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, शेमदेव चापले, विदर्भप्रमुख शैलेश तिवारी, महिला जिल्हाध्यक्ष संगिता राऊत उपस्थित होते. बेरोजगारी रोजगाराच्या संधी आणि युवकांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभिर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सलील देशमुख म्हणाले, पदविधर मतदारसंघाच्या नावनोंदणी अभियानाच्या माध्यमातून अधिकाअधिक पदविधरांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
गडचिरोलीत शेतकऱ्यांचा मोर्चा निघणाार अतुल गण्यारपवार
जिल्हयात उद्योगाच्या नावाखाली शेतकर्यांच्या सुपिक जमिनीचे जबरीबने भुसंपादन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याला राष्टवादी काॅंग्रेस शरद पवार पक्षाचा विरोध असून शेतकर्यांच्या हितासाठी लवकरच मोर्चा काढला जाईल, मोर्चात दलालांना थारा दिला जाणार नाही. अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी दिली. गण्यारपवार पुढे म्हणाले की, जिल्हयात उद्योग निर्माण झाले पाहिजे यासाठी आमचा विरोध नाही. मात्र शेतकर्यांच्या सुपिक जमिनी घेणे याला आमचा प्रखर विरोध आहे. शेतकर्यांची उपजविका शेतीवर अवलंबून आहे. जिल्हयाच्या एकूण भुभागापैक्षा केवळ 12 टक्के क्षेत्र शेतीखाली आहे. शेतकर्यांना भुमिहिन करून देशोधडीला लावणार काय, असा प्रश्नही गण्यारपवार यांनी उपस्थित करीत सरकारवर निशाना साधला.