गडचिरोली जिल्हयात सर्वत्र मुसळधार पाऊस :, भामरागडात पुरात सापडलेल्या 45 नागरिकांना सुखरूप बाहेर काढले

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- गडचिरोली जिल्हयात मागील दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून संततधार कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे भामरागड तालुुक्यात पुरपरस्थिती निर्माण झाली असून. पामुलागौतम नदीस इतर नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे पुरामुळे लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती नाल्याच्या मधोमध अडकून पडले होते. त्यांना एसडीआरएपफच्या मदतीने सुखरूप् बाहेर काढण्यात आले. तसेच भामरागड येथे पुरात अडकलेल्या 45 नागरिकांना सुरक्षीतरत्यिा बाहेर काढण्यात आले. पुरामुळे भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुठला आहे. नदीनाल्यांना पुर आल्याने आज 30 जुलै रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 10 मार्ग बंद पडले होते. गडचिरोली शहरात काल रात्रीपासून मुसळधार पाउुस कोसळला. आज गुरूवारी दुपारपासून पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्हयातील इतर तालुक्यात सुध्दा मुसळधार पाउुस कोसळत असून प्रत्येक तालुक्यातील पावसाची सरासरी 100 मी.मी पेक्षा अधिक आहे. अतिवृष्टीमुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत असून नदीकाठालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदी, नाल्याच्या पुलावरून पाणी वाहतांना मार्गक्रमण करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात करण्यात आले आहे.