जिल्हा

शिक्षणामुळे जीवनातील अंधकार दूर होऊन ज्ञानाची ज्योत प्रज्वलीत होते..! * छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद  कात्रटवार यांचे प्रतिपादन **शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला !

AVB NEWS गडचिरोली  :- छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद कात्रटवार यांचा वाढदिवस सेवाभाव दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्य अरविंदकात्रटवार मित्र परिवारांच्या वतीने मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या आंबेशिवणी, आंबेशिवणी टोली, आंबेटोला, भिकारमोशी, अमीर्झा टोली, अमीर्झा, कळमटोला, टेंभा, चंभर्डा, मरेगाव, मौशिखांब, बेलगाव, मोहटोला, राणखेडा, मुरमाडी, मौशिचक, बोथेडा, गिलगाव शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहेऱ्यावर आनंद फुलले

शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद कात्रटवार म्हणाले की, जीवनात यशप्राती आणि बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे साधन आहे. प्राथमिक शिक्षण ही शिक्षणाची पहिली पायरी आहे त्यामुळे ती मजबूत बनली पाहिजे. प्रत्येकाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी उत्तम शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण व्यक्तिमत्त्व घडवण्यास मदत करते आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढवते. शालेय शिक्षण प्रत्येकाच्या जीवनात मोठी भूमिका बजावते. मुलांना यशाच्या दिशेने जायचे असेल तर ते केवळ चांगल्या आणि योग्य शिक्षणानेच शक्य आहे. शिक्षण जीवनातील कठीण काळात आव्हानांचा सामना करण्यास मदत करते आणि माणसाला स्वावलंबी बनवते. शिक्षणामुळेच जीवनातील अंधकार दूर होऊन ज्ञानाची ज्योत प्रजवलीत होते, असे प्रतिपादन छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद कात्रटवार यांनी केले.

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात शिक्षणाला खूप महत्त्व आहे शिक्षणाचा स्तर वाढवण्यासाठी अनेक पद्धती अवलंबल्या जातात. सध्याच्या काळात संपूर्ण शिक्षण पद्धतीच बदलली आहे. आता आपण बारावीनंतर दूरस्थ शिक्षण कार्यक्रमाद्वारे नोकरीसोबतच अभ्यास करू शकतो. कौशल्य विकासरूपी शिक्षणाला महत्व प्राप्त झाले आले आहे. मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राचा शैक्षणिक विकास घडवून आला पाहिजे. या क्षेत्रातील विद्यार्थी उच्चशिक्षण घेऊन चांगल्या पदावर पोहचले पाहिजेत. यासाठी प्राथमिक शिक्षणापासून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण झाली पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण देऊन त्यांचा शैक्षणिक विकास घडवून आणला पाहिजे. जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक शाळांना सुसज्ज इमारती, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याची शिक्षण विभागाची जबाबदारी आहे.या क्षेत्रामधील शाळांमध्ये काही शैक्षणिक समस्या असल्यास त्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर आहे, असेही अरविंदकात्रटवार म्हणाले.

*याप्रसंगी यादव लोहंबरे, गोपाल मोंगरकर, विनोद चापले, दिपक लाडे, यादव चौधरी, शाम झोडे, मोतीराम भुरसे, जगण चापले, बळीराम गेडाम, तानबा दजगाये, शुभम कुकडकर, भूषण लोहंबरे, भीमराव ठाकरे, चांगदेव कोहपरे, गणेश वाघमारे, पितांबर नैताम, नक्टू कलसर, राहुल ठाकरे, भूषण ठाकरे, शुभम समर्थ, प्रवीण म्हस्के, अजय संदोकर, विजय मत्ते, बालाजी चापले, भवन चापले, पूनम झंझाळ, निखिल कुढवे, विकी वाडणकर, विकास ठाकरे, राहुल ठाकरे, साहिल कोहपरे, रोहित चणेकार, चैतन्य मेश्राम, ढिसू ढवळे, लक्ष्मण चौधरी, राजेंद्र ढवळे, दुर्योधन भैसारे, सुधाकर ढवळे, भूषण गुरुकार, महेश खेडेकर, चंद्रशेखर पेंदाम, सुनील कोसमशिले, मनोहर कोसनशिले, दीपक कोसनशिले, प्रशांत मडावी, मंगल भरणे, मोहित, अनुज कुमिटी, प्रकाश भजभुजे, सूरज वाघाडे, रुपेश ठाकरे, मोहित पेंदाम, जितेंद्र वाघमारे, समीर ठाकरे छत्रपती सैनिक व गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.