गोेरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निंबोरकर दांम्पत्याचा आदर्श संकल्प * शैक्षणिक विकासासाठी 20 लाखाचा निधी उभारणार

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- गोेरगरीब, गरजू आणि होतकरू विद्याथ्र्यांच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाठी गडचिरोली शहराच्या नगराध्यक्ष अॅड प्रणोती निंबोरकर व नगरसेवक सागर निंबोरकर या दांम्वत्यांनी पुढाकार घेतला आहे. नगराध्यक्ष निंबोरकर यांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळातील मानधन शिक्षणासाठी समर्पित करण्याची घोषणा केली असून नगरसेवक सागर निंबोरकर यांनी स्वखर्चातील योगदानासह एकंदरीत 20 लाखाचा निधी उभारण्याचा संकल्प केला आहे.
या उपक्रमांतर्गत नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांच्या कार्यकाळातील 12 लाखाचे मानधन आणि नगरसेवक सागर निंबोरकर यांच्या स्वखर्चातून 20 लाखाचा निधी उभा केला जाणार असून तो टप्पाटप्याने खर्च केला जाणार आहे. सदर निधीतून गोरगरीब आणि गुणवंत विद्याथ्र्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. आर्थिक परिस्थीतीमुळे कोणताही होतकरू विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये हाच उपक्रमाचा प्रमुख हेतू असल्याची भावना निंबोरकर दांम्पत्यांनी व्यक्त केली आहे.निंबोरकर यांच्या उपक्रमाचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात येत आहे.