घोट क्षेत्रातील 14 गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार : -अनिरुद्ध पालकर * मंजेगाव येथे स्थानिक सात गावातील शेतकऱ्यांसोबत अनिरुद्ध पालकर यांचे थेट संवाद,

AVB NEWS घोट :- रेगडी हळदवाही क्षेत्रातील 1958 पासून शेतीच्या पट्ट्या पासून वंचित शेतकऱ्यांना राज्य सरकारने या भागातील सात गावातील शेतकऱ्यांना,शेतीचे पट्टे द्यावे, व या भागातील चौदा गावातील शेती सिंचन प्रश्नाबाबत सदर समस्या ऐकून घेण्यासाठी गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते यांचे मार्गदर्शनात मंजेगाव येथे या भागातील सात गावातील शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे (ओ.एस.डी.) अनिरुद्ध पालकर यांनी जिल्ह्यात प्रथमच थेट संवाद साधला. व शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या,व प्रामुख्याने या भागातील 14 गावच्या सिंचन प्रश्नाबाबत महत्वाची चर्चा झाली.
या विषयासाठी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी रोशन मेश्राम व अभियंता विकास दूधबावरे उपस्थित होते.कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे,अतिथी डॉ.भारत खटी उपस्थित होते, घोट क्षेत्रातील, मंजेगाव,किसाननगर, मछली, चक चापलवाडा,जवाहर नगर, सिमूलतला, किसानगर हळदवाही,हळदवाहीटोला,पेटतळा, भाडभीडी, भागातील शेतकरी व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांना माजी खासदार अशोक नेते यांनी भ्रमणध्वनीवर लाईव्ह मार्गदर्शन केले. व अनिरुद्धजी पालकर , डॉ. प्रनय खुणे,डॉ. भारत खटी यांनी मार्गदर्शन केले व प्रामुख्याने अनिरुद्धजी पालकर साहेब यांनी मार्गदर्शन करताना सांगितले जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या समस्या निराकरणासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे. असे प्रतिपादन केले,व जिल्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात रोजगार स्वयंरोजगाराची दालने उघडली जात आहेत,व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात कार्य सुरू आहे. व राज्य सरकारच्या वतीने शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले जाणार आहे. व घोट भागातील 14 गावातील नागरिकांना न्याय मिळवून देणार असे सांगितले,
यावेळी प्रामुख्याने राष्ट्रीय मानवाधिकार संघटन जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी,उपाध्यक्ष नानू उपाध्ये, किशोर कुंडू,संघटना पदाधिकारी दिनेश मुजुमदार, विनोद किरमे, पलास घरामी, सुमेन विस्वास, राजू सातपुते,संदीप भोवरे, जितेन शहा,अंकुश तरफदार,आयोजक माजी सरपंच रमेश लेकलवार, बाबुराव बर्लावार, विठ्ठल बोंमकंटिवार,वर्षा गर्तूलवार, गंगाधर रामटेके, विनायक डुबूलवार,वसंत तुंकलवार, व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक संजय गोरडवार, यांनी केले व आभार रवींद्र गर्तूलवार यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंजेगाव येथील शेतकरी पदाधिकारी युवक पदाधिकारी यांनी अथक प्रयत्न केले.