विशेष

भाजपाकडून सुधाकर कोहळेंना उमेदवारी ; अनिल सोलेंना दुसऱ्यांदा डावलले *  नागपूर पदविधर मतदारसंघ  निवडणूक

एव्हीबी न्यूज गडचिरोली  :- कॉंग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अभिजीत वंजारी यांना पुन्हा नागपूर विभाग पदविधर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता भाजपाकडून उमेदवार जाहीर करण्यात आली असून सुधाकर कोहळेंना नागपूर पदविधर मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपकडून सुधाकर कोहळे आणि अनिल सोले हे इच्छुक उमेदवार होते. अनिल सोले यांचा सोशल मीडियावर त्याप्रकारचा प्रचारही सुरू झाला होता . गेल्या पदवीधर निवडणुकीत भाजपने अनिल सोले यांना ऐनवेळी डावलून संदीप जोशी यांना उमेदवारी दिली होती. या निवडणूकीत जोशी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता दुसऱ्यांदा अनिल सोले यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

नागपूर, वर्धा, भंडारा, गांेदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्हयाचा समावेश आहे.नागपूर पदविधर मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 29 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

 

 

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.