काँग्रेसकडून आ. अभिजीत वंजारींना पुन्हा उमेदवारी *** आमदार वंजारी यांच्यापुढे गड कायम राखण्याचे तगडे आव्हान * मागील निवडणूकीत वंजारी यांनी भाजपाचे उमेदवार संदीप जोशी यांचा 18 हजार 910 मतांनी केला होता पराभव

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- काँग्रेस चे विधान परिषदेचे आमदार अभिजीत वंजारी यांना पुन्हा नागपूर विभाग पदविधर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आ. वंजारी हे सोमवार 5 ऑक्टोबर रोजी नागपूरात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र भाजपाने अद्यापही आपला उमेदवार घोषीत केला नसून भाजपा वंजारीच्या विरोधात कोणाला उभे करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
2026 च्या निवडणूकीसाठी महायुतीने जोरदार कंबर कसली असून आमदार अभिंजीत वंजारी यांच्यापुढे आपला गड कायम ठेवण्याचे तगडे आव्हान राहणार आहे.
नागपूर, वर्धा, भंडारा, गांेदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्हयाचा समावेश असलेल्या मतदारासंघावर 1978 पासून भाजपाचे वर्चस्व राहीले. मात्र 2020 च्या निवडणूकीत कॉंग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांना भाजपाचे उमेदवार संदीप जोशी यांचा पराभव करून समिकरणेच बदलले.
सन 2020 मध्ये पार पडलेल्या नागपूर पदविधर मतदारांघाच्या निवडणूकीत कॉंग्रेसने आ. अभिजीत वंजारी यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपाकडून संदीप जोशी रिंगणात होते. या निवडणूकीत 2 लाख 6 हजार 454 नोंदणीकृत मतदारांपैकी 1 लाख 32 हजार 923 मतदारांनी मतदान केले. या निवडणूकीत कॉंग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी भाजपाचे उमेदवार संदीप जोशी यांचा 18 हजार 910 मतांनी पराभव केला होता. जोशी यांना 42 हजार 799 मते मिळाली, तर वंजारी यांना 61 हजार 701 मते मिळाली. विशेष म्हणजे नागपूर पदविधर मतदारसंघातून 1978 नंतर प्रथमच भाजप किंवा मित्रपक्षाबाहेरील उमेदवार विजयी झाला. नागपूर पदविधर मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 29 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.