जिल्हा

गोंडवाना विद्यापीठाचा ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ स्वर्गीय डॉ. शिवनाथ कुंभारे यांना मरणोपरांत प्रदान  * विद्यापीठाच्या वर्धापन दिन समारंभात सुमन शिवनाथ कुंभारे यांनी स्विकारला पुरस्कार

एव्हीबी न्यूज गडचिरोली :-  गोेंडवाना विद्यापीठाचा 15 वा वर्धापन दिन समारंभ आज 2 ऑक्टोबर रोजी पार पडला. या सोहळयात गोंडवाना विद्यापीठाचा ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ समाजसेवक स्वर्गीय डॉ. शिवनाथ कुंभारे यांना मरणोपरांत देण्यात आला . हा पुरस्कार त्यांच्या पत्नी सुमन शिवनाथ कुंभारे यांनी स्वीकारला . आणि डॉ. राजन पन्नालाल जयस्वाल यानाही हा पुरस्कार देण्यात आला .

कार्यक्रमाच्या अध्यस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, प्र-कुलगुरू श्रीराम कावळे,कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, लक्ष्मीनारायण विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नीरज खटी, मानव्य विज्ञान अधिष्ठाता डॉ. श्याम खंडारे, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. नविन मुंगळे , श्रीमती सुमन शिवनाथ कुंभारे, डॉ. राजन पन्नालाल जयस्वाल ,व्यवस्थापन परिषद सदस्य गुरुदास कांमडी , डॉ. विजय वाढई , प्रा. संजय गोरे , प्राचार्य लेमराज लडके, डॉ. विवेक गोर्लावार, प्रशांत दोनतुलवार, वित्त विभागाचे उपकुलसचिव देवेंद्र झाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच 2024-25 या वर्षात राज्यशासनाचा डॉ. जे. पी. नाईक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शरद पवार महाविद्यालय, गडचांदूर, प्रा . डॉ. संजय गोरे , गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय, कुरखेडा, प्राचार्य, डॉ. राजाभाऊ मुनघाटे, आदर्श महाविद्यालय, देसाईगंज वडसाचे प्राचार्य, डॉ. श्रीराम गहाणे, डॉ. खत्री महाविद्यालय, तुकूम चंद्रपूर, प्राचार्य डॉ. जनार्धन काकडे यांनाही सन्मानित करण्यात आले.तसेच विशाल मेश्राम या आदिवासी तरुणाचा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

 विविध पुरस्कारांचे वितरण 

१ उत्कृष्ट नॅशनल अचिव्हर्स पुरस्कार डॉ. एस. बी. किशोर, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर
२ उत्कृष्ट अधिसभा सदस्य पुरस्कार डॉ. शीला नरवाडे, चिंतामणी महाविद्यालय, पोंभुर्णा
३ उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार महात्मा गांधी विज्ञान महा. गडचांदूर, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ
४ उत्कृष्ट शारीरिक शिक्षण निर्देशक पुरस्कार डॉ. कुलदीप राजकिशोर गौड, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर
५ उत्कृष्ट महाविद्यालयीन शिक्षक पुरस्कार डॉ. रामदास राजाराम कामडी, आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा
६ पद्मश्री एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार डॉ. मोहन शशिकांत एथकंठीवार, यादवऱाव पोशेट्टीवार कला महाविद्यालय, तळोधी (बाळापूर)
७ उत्कृष्ट विद्यापीठ अधिकारी वर्ग–२ पुरस्कार श्री. कृष्णा देविकर, असिस्टंट प्रोग्रामर , गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
८ उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी वर्ग–३ पुरस्कार श्री. शैलेश येसेंकर, निम्न श्रेणी लिपिक, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
९ उत्कृष्ट महाविद्यालयीन कर्मचारी वर्ग–४ पुरस्कार श्री. संजय लहामू बूराडे, मोहसीनभाई जठेरी महाविद्यालय, देसाईगंज, वडसा
१० उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार श्री. मयूर प्रमोद बुरांडे, आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.