जिल्हा

माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडीनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  घेतली भेट ** गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा

AVB NEWS गडचिरोली : माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांची वर्षा निवासस्थानी  आमदार बंटी  भांगडिया यांच्या समवेत भेट घेतली. यावेळी गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामे, स्थानिक गरजा तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.या भेटीप्रसंगी नगरसेवक सागर निंबोरकर आणि पंकज खोबे उपस्थित होते.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.