ताज्या घडामोडी
गडचिरोली व चामोर्शी तालुके दुष्काळग्रस्त घोषीत * राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळाची घोषणा
.
एव्हीबी न्यूज गडचिरोली :- राज्य सरकारने राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. यामध्ये गडचिरोली जिल्हयातील गडचिरोली व चामोर्शी या दोन तालुक्याचा समावेश आहे. 25 सप्टेंबरला काढण्यात आलेल्या जीआरनुसार 265 तालुक्यांमध्ये Trigger-1 लागू झाला आहे. राज्य सरकारच्या या जीआरमुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या उपाययोजना देखील तात्काळ सुरु करण्यात येतील. यासोबतच शेतकऱ्यांच्या (Farmers_ खात्यावर तात्काळ मदत जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती, पीक कर्जाचे पुनर्गठन, कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सूट, शेतीपंपाची वीजजोडणी खंडित होणार नाही यासारख्या प्रमुख उपाययोजनांचा समावेश आहे.