जिल्हा
माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, नगरसेवक सागर निंबोरकर यांनी घेतले वर्षा बंगल्यावर बाप्पाचे दर्शन

AVB NEWS मुंबई :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आज माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्यासह भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी डॉ. उसेंडी यांनी बाप्पाची विधिवत पूजा-अर्चा करून गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी व जिल्ह्यातील जनतेच्या सुख, शांती व समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी गडचिरोली नगरपरिषदेचे नगरसेवक सागर निंबोरकर, महेश प्रेमलवार, महेश प्रेमलवार, उपस्थित होते