विशेष

यावर्षी गडचिरोली जिल्हयावर दुष्काळाचे सावट ..! मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 30 टक्के पावसाची तुट  * चामोर्शी, मुलचेरा गडचिरोली व धानोरा तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 70 टक्केच्या आतच

एव्हीबी न्यूज गडचिरोली :-  राज्यातील सर्वाधीक वनव्याप्त जिल्हा म्हणून ओळखल असलेल्या गडचिरोली जिल्हयावर यावर्षी दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. जिल्हयात यावर्षी समाधानकारक पाउुसच झालेला नाही. त्यातच चार तालुक्यात तर पर्जन्यमानाची स्थिती पफारच विदारक आहे. प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या महितीनुसार यावर्षी अल्प पाउुस झाला असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास 30 टक्के पावसाची तुट दिसून येत आहे. त्यामुळे खरीप हंगामातील धान पिक संकटात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर्षी जिल्हयात आातापर्यंत सरासरी 80 टक्के पावसाची नोंद झाली असली तरी चामोर्शी, गडचिरोली, मुलचेरा आणि धानोरा या तालुक्याची सरासरी 70 टक्केच्या आतच आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्हयाचे जुन ते सप्टेंबर पर्यंतचे सरासरी पर्जन्यमान 1254 मिली मिटर इतके आहे. जिल्हयात 21 सप्टेंबर 2026 पर्यंत 1197.5 मि.मि. पाउुस अपेक्षीत होता. परंतू आतापर्यंत केवळ 963 मि.मि. पावसाची नांेंद झाली असून जिल्हयातील पावसाची टक्केवारी 80 टक्के आहे. मागील वर्षी 21सप्टेंबर पर्यंत 1326 मी.मी. पावसाची नोंद झाली असून पावसाची टक्केवारी 110. 8 टक्के इतकी होती. म्हणजे यावर्षीचा पाऊस मागील वर्षीच्या तुलनेत 30 टक्के इतका कमी आहे.

यावर्षी झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी (21 सप्टेंबर 2026 पर्यंत )
गडचिरोली तालुक्यात 829.3 मी.मी पाऊस झाला असून टक्केवारी 60.2 इतकी आहे. धानोरा 968.3 मी.मी, टक्केवारी 67.6 टक्के, देसाईगंज तालुक्यात 1120.5 मी.मी टक्केवारी 90.8 टक्के, आरमोरी तालुका 874.3 मी.मी. टक्केवारी 77.3 टक्के, कुरखेडा तालुका1092.6 मी.मी. टक्केवारी 78.2 टक्के, कोरची तालुका 1007 मी.मी टक्केवारी 77.2 टक्के, चामोर्शी तालुका 498 मी.मी टक्केवारी 52 टक्के, मुलचेरा तालुका 730.3 मी.मी टक्केवारी 62.8 टक्के, अहेरी तालुका 1041 मी.मी टक्केवारी 86.6 टक्के, सिरोंचा तालुका 997 मि.मी टक्केवारी 95.6 टक्के, एटापल्ली तालुका 988.8 मी.मी टक्केवारी 74.2 टक्के आणि भामरागड तालुक्यात 1410 मी.मी इतका पाउुस झाला असून टक्केवारी 99.7 टक्के इतकी आहे.

 

 

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.