जिल्हा

नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्या वाढदिवसाला सेवाभावाची जोड * भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाढदिवस जल्लोषात साजरा;

 

AVB NEWS गडचिरोली :-  भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्हा व शहरच्या वतीने गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांचा वाढदिवस भगवती राईस मिल येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा शहरतर्फे शहरातील विविध भागांत सेवाभावी उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले. नागरिकांच्या हिताचे विविध उपक्रम राबवत वाढदिवसाला सेवाभावाची जोड देण्यात आली.  चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा भाजपा गडचिरोली जिल्हा प्रभारी कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यास जिल्हा व शहर भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाढदिवसानिमित्त भगवती राईस मिल परिसरात भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा अक्षरशः जनसागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. जिल्हा आणि शहराच्या विविध भागांतून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला होता. शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.

यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थित पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि पुढील वाटचालीस यश लाभावे, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

वाढदिवस सोहळ्यानिमित्त सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्याशी स्नेहपूर्ण संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा व शहर भाजपा संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगर परिषदेतील लोकप्रतिनिधी या निमित्ताने एकत्र आल्याने कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त झाले.

 

 

 

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.