पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत ‘माणूसकीचा घास उपक्रम ***उपक्रमात नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग

AVB NEWS गडचिरोली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्य भारतीय जनता पक्ष, गडचिरोली शहराच्या वतीने विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर १७ सप्टेंबर रोजी महिला रुग्णालय, गडचिरोली येथे ‘माणूसकी घास हा सेवा उपक्रम आयोजित करण्यात आला
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत समाजातील गरजू नागरिकांना मदत करणे, आरोग्यविषयक जनजागृती करणे आणि सेवाभावाची भावना अधिक दृढ करणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. महाराष्ट्रातही १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान विविध सेवा उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा, आरोग्य, स्वच्छता आणि जनसहभागाशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
“वाढदिवसाचा उत्सव केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता समाजसेवेच्या माध्यमातून साजरा करूया, हाच मानवतेचा खरा धर्म आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, उपाध्यक्ष निखिल चरडे, बांधकाम सभापती अनिल कुणघाडकर,रमेशजी भुर्से,घनशाम वाढयी, महिला कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.