नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर यांनी बालकांना भेटवस्तू देऊन तान्हा पोळयाच्या दिल्या शुभेच्छा ! * गडचिरोली शहरात तान्हा पोळा सण उत्साहात

AVB NEWS गडचिरोली :- लहान मुलांचा आवडता आणि महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीशी नाते सांगणारा तान्हा पोळा सण गडचिरोली शहरात मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्षा प्रणोती सागर निंबोरकर व नगरसेवक सागर अरुण निंबोरकर यांनी उपस्थित लहान मुलांचे कौतुक करून त्यांना भेटवस्तू देत तान्हा पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या.
तान्हा पोळ्यानिमित्त लहान मुलांनी आकर्षक पद्धतीने सजवलेल्या लाकडी व मातीच्या बैलजोड्या तयार करून आणल्या होत्या. रंगीबेरंगी बैल, फुलांची सजावट आणि पारंपरिक वेशभूषेमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी मुलांनी आपल्या बैलजोड्यांची विधिवत पूजा करून नैवेद्य दाखवला. याप्रसंगी नगराध्यक्षा प्रणोती सागर निंबोरकर व नगरसेवक सागर अरुण निंबोरकर यांनी उपस्थित लहान मुलांचे कौतुक करून त्यांना भेटवस्तू देत तान्हा पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या.
तान्हा पोळा हा केवळ मुलांच्या आनंदाचा सण नसून, शेतकरी आणि बैल यांच्यातील अतूट नाते, कष्टाचे महत्त्व आणि आपल्या समृद्ध कृषी संस्कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा सण आहे.
लहान मुलांना आपल्या परंपरा आणि संस्कृतीची ओळख व्हावी, सण-उत्सवांचे महत्त्व समजावे आणि पुढील पिढीपर्यंत ही परंपरा कायम राहावी, यासाठी तान्हा पोळ्याचे विशेष महत्त्व आहे.
उत्साह, आनंद आणि संस्कृतीचा सुंदर संगम घडवत गडचिरोलीत तान्हा पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.