शिक्षक हे समाज घडविणारे खरे शिल्पकार…! नगराध्यक्षा प्रणोती सागर निंबोरकर यांचे प्रतिपादन * सेवानिवृत्त शिक्षक संघटनेसोबत शिक्षक दिन उत्साहात साजरा

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- शिक्षक हे समाज घडविणारे खरे शिल्पकार आहेत. विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर संस्कार, शिस्त आणि जीवनाची योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक करतात. सेवानिवृत्तीनंतरही शिक्षकांचे अनुभव आणि मार्गदर्शन समाजासाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन प्रणोती सागर निंबोरकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना, जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या सोबत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी नगराध्यक्षा प्रणोती सागर निंबोरकर यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
शिक्षकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.