प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांची आदर्श प्राचार्य पुरस्कारासाठी निवड *** पुणे येथे शिक्षक दिनी होणार पुरस्काराने सन्मान

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांची शासनाच्या डॉ. जे.पी.नाईक आदर्श पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ५ सप्टेंबर रोजी पुणे येथे आयोजीत शिक्षक दिन समारंभात त्यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. यापुर्वी त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट शासनाचा महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार, गोंडवाना विद्यापीठाचा आदर्श प्राचार्य पुरस्कार, ग्लोबल एज्युकेशन एक्सलन्स अवार्ड यासह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
डॉ. राजाभाऊ मुनघाटे मागील २३ वर्षापासून प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळत असून दुर्गम भागातील शैक्षणिक विकासासज्ञठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या प्राचार्य फोरमचे अध्यक्ष, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य आणि मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. राष्टसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यासमंडळाचे अध्यक्ष, बालभारती पुणेचे सदस्य तसेच मंुबई विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी योगदान दिले आहे. त्यांनी श्री. गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयात उन्नत भारत अभियान, वेलनेस क्लब, महीला अध्ययन, राष्टीय सेवा योजना, रोजगार मार्गदर्शन केंद्र यासह विविध उपक्रम सुरू केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या वार्षी अंकाला सलग पाच वर्ष गोंडवाना विद्यापीठाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार माझा नसून सर्व सहका्यांचा असल्याची भावना प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी व्यक्त केली आहे.
आंतराष्टीय परिषदांमध्ये सहभाग
प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी नॅक पियर टीमचे सदस्य म्हणून देशातील विविध राज्यातील महाविद्यालयांना भेटी देऊन शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या प्रक्रीयेत सहभाग घेतला आहे. चीन, रशिया, दुबई, बाली, सिंगापूर आणि मलेशिया आदी देशांमध्ये त्यांनी आंतराष्टीय परिषदांमध्ये संशोधनपर लेख सादर केले आहेत.