माता व नवजात बाळ मृत्यू प्रकरणात दोषी वैद्यकीय अघिकाऱ्यांवर कारवाई करा * आझाद समाज पक्षाची जिल्हा शल्यचिकीत्सकांकडे मागणी

AVB NEWS गडचिरोली “- माता व नवजात बाळ मृत्यू प्रकरणात दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आझाद समाज पक्षाच्या वतीने जिल्हा शल्यचिकीत्सकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
. वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने रुग्णावर उपचार होण्यास विलंब झाला. पेशंट नॉर्मल होते, दिवस पूर्ण झाले होते. चामोर्शी रुग्णालयात सीझर होत असताना वैद्यकीय अधिकारी नेहमीच हात झटकून Refer करतात. सोनोग्राफी ची व्यवस्था असताना हॉस्पिटल मध्ये केवळ 1 दिवस सोनोग्राफी करतात व इतर दिवस डॉ. देऊरी आपल्या खाजगी क्लीनिक ला रुग्णाना बोलवून सोनोग्राफी करायला लावतात. असा आरोपही आझाद समाज पक्षाने केला आहे.
वरील प्रकरण गंभीर असून तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी व पीडित परिवारास आर्थिक मदतीसाठी पालकमंत्री यांचेकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा अशी मागणी घेऊन आजाद समाज पक्षाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांना निवेदन सादर केले.