जिल्हा

गडचिरोली पोलीस दलातील 20 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना  ‘पोलीस शौर्य पदक’ जाहिर

AVB NEWS गडचिरोली :- देशभरामध्ये पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शासनाकडून सन्मानित केले जात असते. यावर्षी सुद्धा आज  14 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला  महामहीम राष्ट्रपती यांचे संपूर्ण देशभरात एकूण 272 पोलीस शौर्य पदक व 606 गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहिर झाले असून, त्यापैकी गडचिरोली पोलीस दलास 20 पोलीस शौर्य पदक व 01 गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहिर झाले आहेत. गडचिरोली पोलीस दलास सन 2026 मध्ये एकूण 31 पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले असून मागील पाच वर्षात एकूण 03 शौर्य चक्र, 237 पोलीस शौर्य पदक व 07 गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले आहेत.

पोलीस शौर्य पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार 1) यतिश विजयराव देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर (तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक (अभियान), गडचिरोली) 2) सहाय्यक पोलीस निरीक्षक/ राजु पांडुरंग गवळी, 3) सहाय्यक पोलीस निरीक्षक/वासुदेव राजम मडावी, 4) पोहवा/5074 दिलीप विठ्ठल आत्राम, 5) पोहवा/3032 मासा बोरा आत्राम, 6) पोहवा/2643 विजय किष्टय्या कोडापे, 7) नापोअं/5072 दशरथ रामशहा मडावी, 8) पोअं/5724 अजय गोपालराव मडावी, 9) पोअं/5782 गणेश चंद्रम डुब्बुला, 10) पोअं/5960 विजय झुरु मडावी, 11) पोअं/5901 भुपेश मारोतराव जुमनाके, 12) पोअं/4636 राकेश राजम बेडकी, 13) पोअं/5621 सुधाकर जगन पोरतेट, 14) पोअं/5563 श्रीनिवास समय्या निष्ठुरी, 15) पोअं/4629 गणेश हनमंतू गंजीवार, 16) पोअं/5529 नितेश प्रभुदास टेंभेकर, 17) पोअं/5587 शिवाजी मेस्सो हिचामी, 18) 5884 संजय मल्लेश कंकाबंडावार, 19) पोअं/126 राजेश शामराव किरंगे, 20) पोअं/5167 दलसु कटिया बोगामी यांना पोलीस शौर्य पदक मिळाले असून, 1) यांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक मिळाले आहेत.
सन 2023 मौजा केडमारा, ता. भामरागड व सन 2024 मध्ये मौजा कंत्रनगट्टा ता. भामरागड येथे झालेल्या पोलीस माओवादी चकमकीमध्ये एकूण 06 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यास गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले होते. वरील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी सदरच्या चकमकीमध्ये केलेल्या यशस्वी कामगिरीची दखल घेऊन मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक जाहिर झाले.
यासोबतच गृह मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून पोलीस दलामध्ये 25 वर्षापेक्षा अधिक निष्कलंक सेवा बजावणा­या 27 अंमलदार यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक तसेच 15 वर्षापेक्षा अधिक निष्कलंक सेवा बजावणा­या 03 अधिकारी व अंमलदार यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहिर करण्यात आले आहेत. यावेळी सर्व पदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मा. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी कौतुक केले आहे व त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.